• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर येथे शांतता समितीची बैठक

by Mayuresh Patnakar
September 12, 2026
in Guhagar
21 0
0
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, नामवंत वकील सुशील अवेरे, दीपक परचुरे, जयदेव मोरे, विनोद जानवळकर, इमरान घारे यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. Peace Committee meeting at Guhagar

यावेळी सभापती प्रणव पोळेकर यांनी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पालशेत, आबलोली, शृंगारतळी, गुहागर येथे गणेशोत्सव दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी होमगार्ड तसेच पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत, अशी सूचना केली. Peace Committee meeting at Guhagar

वकील सुशील अवेरे यांनी शृंगारतळी बाजारपेठ येथील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणावर संबंधित संस्था व ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांच्या परवानगीने बाजारपेठमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने या ठिकाणी उभी करण्यात यावीत अशी सूचना केली. त्याचप्रमाणे सकाळी व सायंकाळी शृंगारतळी बाजारपेठ मधून अनेक ट्रॅव्हल्स जात असतात त्यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी त्या पद्धतीने नियोजन करण्यात यावे, अशी विनंती केली. यावेळी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी गणेशोत्सवामध्ये शांतता, सलोखा व सामाजिक एकोपा कायम राखण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्यातील मुख्य बाजारपेठ येथे वाहतूक कोंडी होणार नाही, याची पोलीस प्रशासनाकडून दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. Peace Committee meeting at Guhagar

तसेच तेथील व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंती केली.मंडळांना आवश्यक परवानग्या व सुरक्षेसाठी ‘एक मंडळ-एक पोलिस’ संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले,पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पणे सर्वांनी पालन करावे अशी सूचना केली. बाजारपेठ मधील मोकाट असलेल्या गुरांच्य गळ्यामध्ये सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून रेडियमचे पट्टे लावण्यात आले असल्याचे सांगितले. Peace Committee meeting at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPeace Committee meeting at Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.