मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आधार व स्वयंम योजनेचे अर्ज सुरू
रत्नागिरी, ता. 26 : उच्च शिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ राबवण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana
पात्र प्रवर्ग- इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच धनगर समाजातील विद्यार्थी.
अभ्यासक्रम – १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक तसेच बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
पात्रता अट – उच्च शिक्षण घेत असलेले परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी.
अधिकृत संकेतस्थळ – विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahsit.org/ या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि सोबत जोडलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची एक छायांकित प्रत (झेरॉक्स) रत्नागिरी येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावयाची आहे. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana