जिल्ह्यात कॅराब्यान पार्किंगची व्यवस्था होणे गरजेचे; माजी आमदार डॉ. विनय नातू
गुहागर, ता. 10 : सिंधूरत्न 1 ही योजना चांदा ते बांदा यासाठी राबवण्यात आली. परंतु सदर योजना सिंधुदुर्ग पुरतीच मर्यादित राहिली. मात्र सिंधुरत्न 2 ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असून यामधून बॅकवॉटर पर्यटनाला संधी आहे. तर जिल्ह्यात कॅराब्यान पार्किंगसाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे अशी माहिती सिंधूरत्न 2 योजना जिल्हा उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी दिली. Opportunity for backwater tourism through Sindhuratna 2
डॉ. विनय नातू यांनी सोमवारी सिंधूरत्न 2 या योजनेविषयीचा आणि एकूणच पर्यटनाविषयी पत्रकारांजवळ संवाद साधला. त्यांनी यावेळी बोलताना सिंधूरत्न 1 यावर महायुतीच्या काळामध्ये ही तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी होते. मात्र ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समजली नाही. शेतकऱ्यांकरता भात बियाणे, नाचणी बियाणे, भाजीपाला बियाणे, फळमाशी ट्रॅप सेट यासारख्या सुविधा या योजनेतून देण्यात आल्या. आपल्याकडे हाऊस बोटही आली. परंतु ती महासंघाकडे देण्यात आली आणि आत्ता ती यशस्वी होत नाही असे बोलले जात आहे. यासाठी याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण योजना या सिंधूरत्न 2 मधून आपल्याला घेता येईल. Opportunity for backwater tourism through Sindhuratna 2
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये या योजनेची माहिती आपण दिली आहे. या योजने करता 200 कोटीची तरतूद करण्यात आली आहे यामुळे या योजनेमधून मत्स्य व्यवसाय, पर्यटन, प्रक्रिया उद्योग, बचत गट सक्षमीकरण त्याचबरोबर कॅराब्यान पर्यटन सारखा प्रकल्प राबवता येईल. या योजनेमधून बॅक वॉटर सारखा पर्यटन प्रकल्प राबवता येईल. त्याच्या जोडीला कांदळवन योजनेचा लाभ घेता येईल. आज प्रत्येक तालुक्यातून फिरताना मत्स्य विभागामधून कोणीही लाभ घेतलेला नाही. जिल्हा नियोजन कामाला जोडून ही सपोर्टेड योजना म्हणून याकडे पाहता येईल. कॅराबॅन सारख्या वाहनातून ज्यामध्ये राहण्याच्या सर्व सुविधा आहेत अशा या प्रकल्पाला जिल्ह्यात पार्किंग करता जागा नाही. ती जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल याकरिता प्रत्येक क्षेत्राला माहिती दिली जात असून या वर्षभरामध्ये प्रस्ताव करून त्याला मंजुरी घेऊन पुढील तीन वर्षात यातून नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे राहतील. यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. Opportunity for backwater tourism through Sindhuratna 2
