गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ऑनलाइन वेबिनार नुकताच संपन्न झाला. Online webinar at Velneshwar College


या कार्यक्रमात बोलताना, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना समान हक्क व अधिकार मिळवून दिले. आधुनिकता, धर्मनिरपेक्षता व एकात्मता या आधारे देशाला बलशाली बनवण्यात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. म्हणून या देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा नकाशा अभंग ठेवण्यासाठी नव्या पिढीने नेहमीच प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व युवा विचारवंत प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. Online webinar at Velneshwar College


या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. सर्व उपस्थितांना प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री निखील पांढरपट्टे सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण सरगर तर आभार प्रा. केशव चौगुले यांनी व्यक्त केले. Online webinar at Velneshwar College