• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एक घरटे पक्ष्यांसाठी

by Mayuresh Patnakar
June 5, 2021
in Old News
21 0
4
एक घरटे पक्ष्यांसाठी
42
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कृत्रिम घरट्यांतून पक्षी संवर्धन करणारा अक्षय खरे

गुहागर, ता. 5 : गुहागरातील अक्षय खरे या पक्षीमित्र गेली 7 वर्ष कृत्रिम घरट्यांमधून पक्षी संवर्धन करत आहे. आज अक्षय खरे यांच्या पालशेतमधील बागेत 15 व गुहागरच्या  बागेत 8 अशी 23 कृत्रिम घरटी आहेत. त्यापैकी 12 घरट्यांमध्ये शामा, दयाळ आदी पक्षी रहात आहेत. या घरट्यांमुळे आधी बागेत न दिसणारे पक्षी आता दिसू लागलेत. हे पक्षी किटकभक्षी असल्याने उपद्रवी किटकांची संख्या कमी झाली असल्याचे अक्षयच्या निदर्शनास आले आहे.
पक्षांमध्ये दोन प्रकार असतात. काही पक्षी स्वत:चं घरट स्वत: बांधतात तर काही जून्या वृक्षांच्या ढोलीत, दगडांच्या कपारीत, जुन्या घरांच्या भिंतींना पडलेल्या छिद्रात घरटे करतात. सर्वसाधारणपणे अशा तयार बिळात, ढोलीत रहाणारे पक्षी हे किटकभक्षी असतात. आज जंगलातील जुनाट वृक्षांची संख्या तसेच मातीच्या मापांची बनवलेल्या मोठ्या घरांची  संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या पक्षांना अंडी घालण्यास योग्य जागा मिळत नाही. मग हे पक्षी मिळेल त्या पर्यायी जागांमध्ये अंडी घालतात. पण तीथे अंडी सुरक्षित रहात नाही. पिल्लांचेही संरक्षण होत नाही. या पक्षांची संख्या कमी होण्यामागे हे देखील एक कारण आहे.
अक्षय खरेंने 2004 च्या सुमारास कृत्रिम घरटी बांधण्याच्या प्रयोगाला सुरवात केली. साधारणपणे एप्रिल मे महिन्यांच्या शेवटी हे पक्षी अधिवास शोधतात. हे माहिती असलेल्या अक्षयने मार्च महिन्यात गुहागरातील बागेत पहिले पुठ्ठ्याचे घरट लावले. परंतू ते पावसात मोडले. मग घरातील प्लायवूडचे तुकडे वापरुन घरटे तयार केले. पण जास्त घरटी तयार करायची तर सहज उपलब्ध वस्तूंपासून ते बनलेले पाहिजे. या विचारातून  तेल, रंगाचे प्लास्टीक कॅनचे घरटे वापरण्याची कल्पना अक्षयसमोर आली. त्याने तसे घरटे बनवलेही. पण कॅनचा पांढरा रंग अडचणीचा ठरला. कॅनमध्ये शिरण्यासाठीचे छिद्र चुकीच्या ठिकाणी पाडले गेले होते. असे अनेक प्रयोग अक्षय करत होता. त्यातून शिकत शिकत 2018 मध्ये कृत्रिम घरट्याचा एक यशस्वी आराखडा निश्चित झाला.
प्लास्टीकच्या कॅनला रेडऑक्साईटचा रंग मारायचा. कॅनच्या तळाशी पाणी जाण्यासाठी व कॅनच्या डोक्यावर हवा खेळती रहाण्यासाठी छोटी छिद्र पाडायची. कॅनमध्ये लाकडाचा भुसा टाकायचा. पक्षांना ये जा करण्यासाठी कॅनच्या वरच्या भागात दिड ते दोन इंचाचे छिद्र ठेवायचे.  असे घरटे पक्षांना चटकन आकर्षित करते. हे प्रयोगाअंती सिध्द झाले.
आज अक्षयने पालशेत आणि गुहागरमधील नारळ, सुपारीच्या बागेत अशी 23 घरटी लावली आहेत. अक्षय केवळ स्वत:च घरटी करुन थांबला नाही. त्याने आपल्या अन्य मित्रांनाही पक्षी संवर्धनाचा हा नवा मार्ग दाखविला. त्यातील तीन मित्रांनीही अशी कृत्रिम घरटी बांधली आहेत.
चला तर मग आपणही आपल्या घरातील टाकावू कॅनपासून अशी घरटी बनवुया आणि अक्षयच्या पक्षी संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी होवू या.

अक्षयने दिलेल्या टीप्स्‌ विसरु नका…
घरटे जमीनीपासून किमान 10 फुट उंचीवर, आडबाजुच्या झाडावर बांधावे.
घरटे बांधताना त्याचे प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे. दक्षिणेकडून सतत येणारा सूर्यप्रकाश पक्षांना सहन होत नाही.
घरटं झाडावर लटकवताना मजबुत बांधावे. जेणेकरुन वादळवाऱ्यात, बांधलेली दोरी कुसली म्हणून घरटं कोसळता कामा नये.
सर्वात महत्त्वाचे घरटे बांधून झाले की त्याकडे दुर्लक्ष करावे. त्यात पक्षी आला की नाही याचे निरीक्षण करत बसु नये.


कॅनपासून बनवलेली कृत्रिम घरटी
कॅनपासून बनवलेली कृत्रिम घरटी

One Nest to Save Bird

Akshay Khare, Help birds through artificial nests

Akshay Khare, a bird lover from Guhagar, has been raising birds from artificial nests for the last 7 years. Today, Akshay Khare has 23 artificial nests in his garden. Among them, birds like Shama, Dayal etc. are living in 12 nests. Because of these nests, birds that were not previously seen in the garden are now visible. As these birds are insectivorous, the number of pests has decreased, says Akshay. 
There are two types of Birds. Some birds build their own nests, while others build their nests in old tree trunks, stone slabs, and holes in the walls of old houses. Birds that live in such prepared burrows are usually insectivores. Today the number of old trees in the forest as well as the number of large houses made of clay have decreased. So these Birds do not get a proper place to lay their eggs. These birds then lay their eggs in alternate places. But the eggs are not safe there. Puppies are not protected either. This is also one of the reasons for the decline in the number of these Birds. 
Akshay Khare started experimenting with artificial nests from 2004.After 14 Years (in 2018) slef experiments Akshay got successful design of the artificial nest. 
Tags: Akshay Khareartificial nestbirdBreaking NewseggsGuhagarGuhagar NewsHelpholesLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsnestNews in GuhagarNews in Marathiold housesold treesstone slabsthe wallstrunksटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.