• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उपनगराध्यक्षाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही

by Ganesh Dhanawade
April 7, 2021
in Old News
16 0
1
guhagar nagarpanchyat
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी

गुहागर, ता. 07 :   गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे अधिक सक्षमपणे सुरु रहाणार आहे. अशी प्रतिक्रिया गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी घाईगडबडीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Mayor of Guhagar said, There has been no discussion about the deputy mayor any where. NCP’s taluka president Rajendra Arekar hastily refused to comment.
गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे सलग दोन टर्म निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुजता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी केली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडेहि त्यांनी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, याबाबत बातमी प्रसिद्ध होताच उपनगराध्यक्ष पदाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्याकडे विचारणा केली असता गुहागर नगरपंचायतीमधील काही लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. मात्र उपनगराध्यक्षावरुन आलेल्या बातमीवर इतक्या घाईगडबडीने प्रतिक्रिया देता येणार नाही. असे सांगितले. तर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की,  गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे अधिक सक्षमपणे सुरु रहाणार आहे.
या दोघांच्या प्रतिक्रियांमुळे सध्या तरी उपनगराध्यक्ष पदाबाबत कोणत्याही हालचाली होणार नाहीत हे समोर आले आहे.

संबंधित बातमी
राष्ट्रवादीच्या सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNCPNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.