• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फेम इंडिया–एशिया पोस्टच्या यादीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

by Manoj Bavdhankar
August 13, 2026
in Ratnagiri
28 0
0
Nitin Bagate on Fame India-Asia Post list
54
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

रत्नागिरी, ता. 13 : फेम इंडिया–एशिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचाही समावेश झाला आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. Nitin Bagate on Fame India-Asia Post list

कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, सक्षम नेतृत्व, नागरिकाभिमुख पोलीसिंग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे, अशा विविध निकषांच्या आधारे या यादीसाठी निवड करण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. Nitin Bagate on Fame India-Asia Post list

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासोबतच नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यावर भर दिला जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करताना नागरिकांशी संवाद आणि विश्वासाचे नाते दृढ करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. Nitin Bagate on Fame India-Asia Post list

भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आव्हानांवर मात करत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. Nitin Bagate on Fame India-Asia Post list

फेम इंडिया–एशिया पोस्टच्या मानाच्या यादीत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा समावेश होणे ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात असून, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठीही ही अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. Nitin Bagate on Fame India-Asia Post list

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNitin Bagate on Fame India-Asia Post listटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.