देवस्थानचे अध्यक्ष रमेश वेल्हाळ तर सचिव सुदीप चव्हाण यांची निवड
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी निळकंठेश्वर देवस्थान शृंगारतळीची कार्यकारणी ठरविणेत आली. Nilkantheshwar Temple Shringartali Executive Committee
श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानच्या अध्यक्षपदी रमेशदादा वेल्हाळ, उपाध्यक्षपदी मोहनशेठ संसारे, सचिव पदी सुदीप (पप्पू) चव्हाण, खजिनदारपदी जय (दादू) गुहागरकर तर सल्लागारपदी विश्वास बेलवलकर गुरुजी, कायदेशीर सल्लागारपदी प्रतिष्ठित वकील ॲड. सुशील अवेरे तर विश्वस्त म्हणून श्रीकृष्ण बेलवलकर, मनोज (बापू) कोळवणकर, राजकुमार (नाना) वराडकर, संजय पवार, प्रफुल विखारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Nilkantheshwar Temple Shringartali Executive Committee

या कार्यकारणीचा कालावधी हा पाच वर्षासाठी आहे. संपूर्ण कार्यकारिणीचे गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. Nilkantheshwar Temple Shringartali Executive Committee
