• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निलेश सांबरे यांचा उद्या गुहागर तालुका दौरा

by Mayuresh Patnakar
September 10, 2026
in Guhagar
150 2
0
Nilesh Sambre's visit to Guhagar
295
SHARES
843
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे हे  शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Nilesh Sambre’s visit to Guhagar

दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता पालशेत येथील श्रीम. रखुमाई पालशेतकर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. सकाळी ११ वाजता पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोफत वह्या वाटप आणि विद्यार्थी-पालक, ग्रामस्थ व मान्यवरांशी संवाद होईल. सकाळी ११.४५ वाजता पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या सीनियर कॉलेज येथे मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता गुहागर खालचा पाट-जांभळेवाडी येथे ऍड.प्रसाद प्रज्ञा प्रभाकर जांगळे यांच्या कायदेविषयक नूतन कार्यालयास भेट देऊन उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दुपारी २ वाजता आबलोली येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन होणार आहे. Nilesh Sambre’s visit to Guhagar

या दौऱ्यात शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांना मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देण्यावर भर दिला जाणार असल्याने गुहागर तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 Nilesh Sambre’s visit to Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNilesh Sambre's visit to Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.