• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निलेश गोयथळे आता राज्य कार्यकारिणीचे सदस्य

by Manoj Bavdhankar
October 19, 2021
in Old News
18 0
0
निलेश गोयथळे आता राज्य कार्यकारिणीचे सदस्य
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र ज्युदो संघटना, महासचिवपदी रत्नागिरीचे शैलेश टिळक

गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र ज्युदो संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत गुहागरमधील निलेश गोयथळे या ज्युदो प्रशिक्षकांची राज्याच्या कार्यकारीणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरीचे शैलेश टिळक राज्य ज्युदो संघटनेचे महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारे निलेश गोयथळे यांनी गेली 25 वर्ष ज्युदोच्या प्रचार, प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या राज्य कार्यकारीणीतील निवडीबद्दल गुहागर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गुहागर तालुका पत्रकार संघाचे सेक्रेटरी, ज्युदो प्रशिक्षक, हायस्कुलमधील क्रीडा शिक्षक म्हणून परिचित असलेले निलेश गोयथळे यांनी ज्युदो क्रीडाप्रकारात अनेक गुणवान खेळाडू तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक खेळाडुंनी राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. महाराष्ट्र राज्य ज्युदो संघटनेचे तालुका, जिल्हा स्तरावरील पदाधिकारी म्हणूनही निलेश गोयथळे कार्यरत होते. आज त्यांच्या ज्युदोमधील कार्याची दखल राज्य संघटनेने घेतली. नुकत्याच सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युदो संघटनेच्या निवडणुकीत त्यांना राज्य कार्यकारीणी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.
नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणीत संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे ॲड धनंजय भोसले, महासचिवपदी रत्नागिरीचे शैलेश टिळक व राज्य तांत्रिक समिती अध्यक्ष पदी रवी पाटील, मुंबई  तर सचिव पदी दत्ता आफळे औरंगाबाद यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष पदी मुंबईचे बिलोमोरिया कावस व वाय. एन. बंगेरा, नागपूरचे पुरुषोत्तम चौधरी व अमरावतीचे राजकुमार पूनकर यांची निवड करण्यात आली.
सहसचिव पदी बीडचे गणेश शेटकर, कोषाध्यक्ष पदी नाशिकचे रवींद्र मेतकर, तर सदस्य पदी सतीश पहाडे अमरावती, अतुल बामनोदकर औरंगाबाद, विकास पाटील सातारा, विश्वास जोशी औरंगाबाद, चंद्रशेखर साखरे सांगली, प्रविण गडदे उस्मानाबाद, निलेश गोयथळे रत्नागिरी, जयंत साखरे यवतमाळ, प्रविण कोपटीकर नांदेड, दिनेश बागुल धुळे, निखिल सुवर्णा ठाणे, वीरधवल पाटोळे कोल्हापूर यांची तर विशेष वरिष्ठ सदस्य पदी रत्नाकर पटवर्धन नाशिक, अर्चना  केवाळे अमरावती, शोभना शेटकर बीड यांची नेमणूक झाली आहे.

Tags: Breaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiगुहागरगुहागर न्यूजगुहागरमधील बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.