• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावे फेरीबोट जेटीजवळ सापडले नवजात अर्भक

by Mayuresh Patnakar
August 14, 2021
in Old News
21 0
2
धोपावे फेरीबोट जेटीजवळ सापडले नवजात अर्भक
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी  त्याचा जन्म झाला आहे. रात्री 10 च्या सुमारास गुहागर पोलीस तेथे पोचले असून अधिक तपास करत आहेत.  या घटनेमुळे धोपावे, तरीबंदर परिसरात खळबळ उडाली आहे.  गुहागर तालुक्यात अशा प्रकारे नवजात अर्भक बेवारस सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, धोपाव्यातून दाभोळकडे जाणारा एक प्रवासी रात्री 9 च्या सुमारास लघुशंकेसाठी धोपावे फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयात गेला. त्यावेळी त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्याचवेळी शौचालयाच्या आजुबाजुला त्याला रक्त सांडलेले दिसले. तो प्रवासी घाबरला. ही गोष्ट त्या प्रवाश्याने धोपावे फेरीबोट तिकीटगृहातील कर्मचाऱ्यांना सांगितली. लगेचच सर्वानी तिकीटगृहामागे धाव घेतली. शोधाशोध सुरु केली. तेव्हा खाडीच्या किनाऱ्यालगत असलेल्या खाजणात नवजात अर्भक दिसले. तरीबंदर मधील एका तरुणाने खाडीकिनारी उतरुन सदर नवजात अर्भकाला बाहेर काढले. कपड्यात गुंडाळले. आणि  तिकिटगृहाजवळीत प्रवासी प्रतिक्षाकक्षात ठेवण्यात आले. दरम्यान फेरीबोट कर्मचाऱ्यांनी ही माहिती गुहागर पोलीसांना दिली.
रात्री 10 वाजता गुहागरचे पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम महिला पोलीसांसह घटनास्थळी पोचले. शौचालयाची पहाणी केली. आजुबाजुच्या महिलांजवळ महिला पोलीसांनी चौकशी केली. स्थानिक महिलांनी सदर नवजात अर्भकाचा जन्म अन्यत्र झाला असावा. त्यानंतर अर्भकाला बेवारस सोडण्यात आले असावे. अशी शक्यता वर्तवली. पोलीसांनी अर्भक सापडले त्या ठिकाणाची तपासणी केली असता नाळही तेथेच सापडली. तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांनी पडताळून पाहिले. त्यानंतर नवजात अर्भक आणि सापडलेली नाळ घेवून पोलीस गुहागरला परतले.
सदर नवजात अर्भक हे स्त्री जातीचे असल्याने अनेक तर्क लढवले जात आहेत. सदर अर्भकाचा जन्म दुसरीकडे झाला हा तर्क खरा असेल तर मुलगी नको म्हणून नवजात बालकाला टाकून तर देण्यात आले नाही ना. अशी एक शक्यता आहे. अनैतिक संबंधातून जन्मला आलेले बालक असल्यास ती कुमारी माता धोपावे, तरीबंदर, नवानगर किंवा दाभोळ परिसरातील असु शकते. अशा अनेक चर्चा घटनास्थळी सुरु होत्या.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.