गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पोलीस ठाण्याचा (Maharashtra Police) कारभार आजपासून नव्या शिलेदारांच्या ताब्यात आला आहे. येथील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके (Police Inspector Arvind Bodake) यांच्यासह 9 पोलीसांची अन्यत्र बदली झाली आहे. तर 9 पोलीस गुहागरमध्ये नव्याने रुजू झाले आहेत. त्यामुळे येथे सर्व नवे चेहरे दिसू लागले आहेत.


गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांची बदली रत्नागिरी येथील नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यामुळे गुहागर पोलीस ठाण्याचा कारभार आता सहाय्यक पोलीस निरिक्षक बी. के. जाधव यांच्याकडे आला आहे. अरविंद बोडके दिर्घ रजेवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काही दिवस साळोखे यांनी काम पाहिले. मात्र साळोखे देखील पुन्हा रत्नागिरीला आपल्या मुळस्थानी गेले.


गेली दोन वर्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बी. के. जाधव गुहागरमध्ये आहेत. कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे बी. के. जाधव महाराष्ट्र पोलीसमध्ये येण्यापूर्वी चार वर्ष जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देवून पोलीस दलात प्रवेश केला.
For the last two years Assistant Police Inspector B. K. Jadhav has been working in Guhagar. He is known as strict discipline. Before joining Maharashtra Police Jadhav was working as a Primary teacher in Zilla Parishad for 4 years before. In 2012, he passed the Maharashtra Public Service Commission (MPSC) examination and joined the police force.


पोलीस ठाण्यातील कामकाज पहाणारे संतोष साळसकर गेल्या तीन वर्षात तालुक्याला परिचित झाले होते. नम्रपणे माहिती देणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांची बदली राजापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. संतोष माने यांची चिपळूणला, भालचंद्र मयेकर यांची जयगडला तर ईश्वरी सावंत यांची चिपळूणच्या वहातुक शाखेत बदली झाली आहे. चालक नारकर यांची बदली सावर्ड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस नाईक राजु कांबळी यांची जिल्हा बदली कोल्हापूर येथे झाली असून सप्टेंबर अखेर दरम्यान ते देखील गुहागर पोलीस ठाण्यातून कोल्हापूरला जाणार आहेत.


गुहागरमध्ये पिंट्या फुटक, राजेश धनावडे, कुमार घोसाळकर, गायकवाड, मोनये, शिंदे, लूकमान तडवी, महिला पोलीस स्वामिनी नाटेकर व सौ गौरी शेटे असे 9 पोलीस कर्मचारी नव्याने रुजू झाले आहेत.