ठेकेदार माने; आमदार जाधवांनी घेतला महामार्ग कामाचा आढावा
गुहागर, ता. 19 : कोणत्याही परिस्थितीत 15 जुनपर्यंत मोडकाआगर धरणावरील नवा पुल वहातूकीस सुरु करणार असा शब्द मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिला. मोडकाआगर पुल आणि गुहागरपर्यंतच्या रस्त्याचे कामाचा आढावा आमदार जाधव यांनी मंगळवारी (ता. 18) घेतला.
Shivaji Mane, owner of Manisha Construction, promised MLA Bhaskar Jadhav that, In any case, the new bridge over Modkaagar Dam would be operational by June 15. MLA Jadhav on Tuesday (Feb. 18) reviewed the road work up to Modkaagar Bridge and Guhagar.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत किरकोळ कामात गणना केलेले मोडकाआगर पुलाचे काम गेले वर्षभर सुरु आहे. या पुलामुळे जनता, एस.टी. आणि खासगी वहातूकदार वैतागलेले आहेत. हा वर्षीच्या पावसाळ्यात पुलावरुन वहातूक सुरु झाली नाही तर पुढचे पाच महिने पुन्हा एकदा जनतेला 15 किलोमिटरचा वळसा घालून शृंगारतळीत जावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी (ता. 18) पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
मोडकाआगरच्या पुलावर अधिकाऱ्यांसोबत आमदार भास्कर जाधव यांनी ठेकेदार शिवाजी माने आणि त्यांचे बंधु यांच्याकडून पुलाच्या कामाची पहाणी केली. ही माहिती देताना नम्रपणे मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने आणि त्यांचे बंधू दोघांनीही पुलाचे काम 15 जून पर्यंत पूर्ण करणार हा आमचा शब्द आहे. एवढ्या लोकांच्या समक्ष सांगतो. नक्की 15 जूनपर्यंत वहातूक सुरु करतो. पुढच्या चारपाच दिवसांत पुलाच्या दुसऱ्या बाजुच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु होईल. ते काम झाले की जुना पुल तोडून इथले दगड आणि माती तेथे टाकणार. क्रॉक्रिट रोड होणार नाही. खडीकरण करुन वहातूक सुरु करणार. असे सांगितले.
आमदार जाधव म्हणाले की तुमचे काम चांगले आहे. गुणवत्तापूर्ण आहे. त्याबद्दल वाद नाही. मात्र पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात बाजुने वहातूक पूर्ण होऊ शकत नाही. मी सर्वांना विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट जाहीर करत नाही. त्यामुळे पुन्हा विचारतो हा पुल नक्की सुरु करणार का. त्यावर आमचे गुहागर तालुक्यातील हे पहिलेच काम आहे. पुलाच्या काम रेंगाळल्याने आम्हीपण कंटाळलो आहोत. हे काम पूर्ण गेल्याशिवाय स्वस्थ झोप लागणार नाही. आता किरकोळ काम उरले आहे. पुल सुरु करतानाच रस्त्याच्या कामालाही सुरवात करत आहोत. लॉकडाऊनमध्ये खेर्डी भागातील महामार्गाचे काम पूर्ण केले. आता तेथील मशिनरी गुहागरात आणत आहोत. न्यायालयापासून पुलापर्यंत एका बाजुचा रस्ताही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे आश्र्वासन शिवाजी माने यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि.प. सदस्य प्रविण ओक, सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी सलीम शेख , उप अभियंता मराठे उपस्थित होते.
(मोडकाआगर पुलावर नेमके काय घडले ते पहाण्यासाठी आमचा व्हिडिओ पहाण्यास विसरु नका. तसेच या बातमीवर आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरु नका.)
वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.