फक्त ५ रुपयांत एनसीएमसी कार्ड रिचार्ज करता येणार
मुंबई, ता. 25 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडून महिला आणि सवलतधारक प्रवासी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केलं आहे. एनसीएमसी कार्डच्या वापराची अंमलबजावणी 1 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या दरम्यान एसटी महामंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एनसीएमसी कार्डचा रिचार्ज 5 रुपयांच्या पटीत करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रवासी वारंवार प्रवास करत नाहीत, त्यामळं त्यांची रक्कम एनसीएमसी कार्डमध्ये अडकून पडत असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं एनसीएमसी कार्डचा रिचार्च 5 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेतला आहे. NCMC card can be recharged for Rs. 5
आता NCMC कार्डमध्ये 50 रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची अट नाही. फक्त 5 रुपयांच्या पटीतही टॉप-अप करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज करणे होणार अधिक सोपं झालं आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या गरजेनुसार 5,10, 15, 20, 25 रुपयांचा टॉप अप करता येईल. एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतर यापूर्वी 11.80 रुपये कमिशन म्हणून वजा करुन घेतलं जात होते. यामुळं प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. आता कमिशन आकारणं रद्द केलं जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, व्यवहारावरील कर आकारला जाईल, अशी माहिती मिळत आहे. NCMC card can be recharged for Rs. 5
एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी अजूनही एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढलं नसेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. 31 डिसेंबरपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून NCMC कार्ड महिला व ज्येष्ठ नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते. 6 नोव्हेंबरपर्यंत 1 कोटी 10 लाख कार्डाची नोंदणी व वितरण झालं होतं. 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची 100 टक्के नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 1 जानेवारीपूर्वी एनसीएमसी कार्ड न काढणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यानंतर प्रवासासाठी तिकिटाची पूर्ण रक्कम द्यावी लागू शकते. NCMC card can be recharged for Rs. 5
