• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली कोष्टेवाडी येथे नवरात्र उत्सव

by Mayuresh Patnakar
October 13, 2026
in Guhagar
20 1
0
Navratri Festival at Aabloli Koshtewadi
40
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दुर्गादेवीचा नवरात्र उत्सव दिनांक 11 ते 22  ऑक्टोंबर 2026 या कालावधीत विजयादशमी पर्यंत  उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. Navratri Festival at Aabloli Koshtewadi

या दुर्गा देवीच्या नवरात्रौ उत्सवात  देवीची आरती, भजनाचे कार्यक्रम, श्री. सत्यनारायण महापूजा, दांडिया रास, आरोग्य शिबीरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, अहिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि हळदी कुंकू कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, महाप्रसाद अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  Navratri Festival at Aabloli Koshtewadi

यावर्षी दुर्गादेवीची मूर्ती आबलोली गावचे सुपुत्र आणि पी.एस.आय.  सुशील बबन काजरोळकर यांनी भेट म्हणून दिली आहे. विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नेटके, उपाध्यक्ष स्वप्निल रेपाळ, सचिव प्रथमेश निमूणकर, खजिनदार ऋषिकेश बाईत, ज्येष्ठ सभासद आणि कार्यकर्ते कृष्णकांत रेपाळ, रवींद्र रेपाळ, अजित रेपाळ, वैभव नेटके, गणेश महाडिक, नरेश निमूणकर, शरद उकार्डे, अतिश रेपाळ, विशाल नेटके, शैलेश दिंडे, प्रसाद नेटके, विशाल लोकरे, शरद लांडे, योगेश रेपाळ, सागर रेपाळ, सत्यम गुरसळे, नितेश निमूणकर, ऋषील निमूणकर, सुरज रेडेकर, राजेश तोडकरी, धनराज गुरसळे, अक्षय निमूणकर, नकुल भंडारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते दुर्गा देवीचा नवरात्रौ उत्सव  शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. दहा दिवस होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेपाळ यांच्या मधुर वाणीने होते. Navratri Festival at Aabloli Koshtewadi

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNavratri Festival at Aabloli KoshtewadiNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.