३ एप्रिल रोजी गणपतीपुळेत पुरस्कार वितरण सोहळा
गुहागर, ता. 31 : ईगल फाऊंडेशन (Eagle Foundation) या सेवाभावी संस्थेचे सन – २०२२ चे अत्यंत प्रतिष्ठेचे “गरुडझेप पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता गणपतीपुळे येथे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक गजानन पाटील व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष (प्राथमिक) दिलीप देवळेकर यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. National Garudzep Award


त्यामध्ये गुहागरची मैत्रीबंध प्रतिष्ठान संस्था, ॲड. अरुण देशमुख (मुंबई), श्री. मिहीर गांधी (सोलापूर), डॉ. कृष्णा माळी (सांगली), श्री. मच्छिंद्र घोडके, श्री संजय बैकर (सत्कोंडी), मैनोदीन शेख (लातूर), श्री. सतिश कानवडे (अहमदनगर ), श्री. दशरथ खैरनार, सौ. अर्चना मिनानाथ शेळके, श्री. नानासाहेब मालुंजकर, प्रा. विजय कोष्टी, श्री. अनंत आखाडे (रत्नागिरी), श्री. रविंद्र कोकाटे (इलेक्ट्रॉनिक मिडीया, एबीपी माझा, चिपळूण ), श्री. शरद पळसुलेदेसाई (दै.पुढारी, राजापूर), अलिमिया इब्राहिम काझी (डिजिटल मिडिया- रत्नागिरी, वृतसंपादक – के. टि.व्ही. न्यूज नेटवर्क), इम्तियाज सिद्दिकी, डॉ.चंद्रकांत सावंत (सिंधुदुर्ग ), सौ. संगिता शिवाजी शिंदे (सातारा ), सौ. ज्योती अरविंद सदानशिव, सौ. गिता अतुल शिंदे, सौ. प्रतिक्षा तावडे – (सिंधुदुर्ग), श्री. केदार कुंभार, सौ. आशा सुनिल पाटील, श्री. आनंदा गणपती जाधव (कोल्हापूर ), श्री. बाळकृष्ण पाटसुते, श्री. संजय देवरूखकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. National Garudzep Award


तसेच ऐतिहासिक शिवशंभो लेखी परिक्षेत महाराष्ट्रात अठरावा आलेला चि. स्वराजराजे राशिनकर व याच परिक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात तृतीय आलेले बाबासाहेब राशिनकर यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख पदाधिकारी विलासराव कोळेकर, सागर पाटील, शेखर सूर्यवंशी, प्रशांत लाड, ॲड. जितेंद्र पाटील, बाबासाहेब राशिनकर, संजय नवले, माधव अंकलगे, प्रकाश वंजोळे, उदय महाकाळ यांनी दिली. National Garudzep Award

