गुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (Patpanhale College of Arts, Commerce and Science of Patpanhale Education Society) वतीने मंगळवार दि. 05 एप्रिल 2022 रोजी भारतीय अर्थव्यवस्थेवरील कोविड चा परिणाम या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय ई परिषदेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. आर. जी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या परिषदेला भारतातील 20 राज्यातील प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग घेऊन भरभरून प्रतिसाद दिला. National e-conference held at Patpanhale College


पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रथमता ही परिषद आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय पातळीवरील कोविडच्या परिस्थितीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यावर राष्ट्रीय स्तरावर वैचारिक मंथन होऊन संशोधन व्हावे यासाठी महाविद्यालयाने या परिषदेचे आयोजन केले होते. National e-conference held at Patpanhale College
ही परिषद झुम या प्लॅटफॅार्मवर तसेच युट्युबवर घेण्यात आली. ही राष्ट्रीय परिषद सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत संपन्न झाली. या परिषदेला भारतातील 20 राज्यातील प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग घेऊन भरभरून प्रतिसाद दिला. सुरूवातीला प्रा. पी. ए. देसाई यांनी या परिषदेचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. आर. जी. जाधव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग, पनवेलचे सहसंचालक डॅा. संजय जगताप यानी या परिषदेला बीजभाषण केले. National e-conference held at Patpanhale College


त्यानंतर कर्नाटक राज्यातील बागलकोट येथील बी. व्ही.व्ही. संघा व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॅा. आर.जी. अल्लगी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये कोविडचा आपल्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम कशा प्रकारे झाला. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचे बदललेले स्वरूप आणि भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्था यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात छत्तीसगड या राज्यातील विलासपूर या ठिकाणी असणाऱ्या गुरू घशीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॅा. अलोलकुमार चक्रवाल यांचा सहभाग होता. तसेच त्यांच्या वतीने डॅा. प्रकाश वडवडगी यांनी व भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये एकूण आठ राज्यातील संशोधकानी चौदा संशोधन लेख प्रत्यक्ष सादर केले. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक, गोवा, मिझोराम, पॅाडिचेरी, हरयाना, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओरिसा, या राज्यातील संशोधकांचा समावेश होता.भारतातील विविध राज्यातील एकुण 90 संशोधकांनी आपले संशोधन पेपर या परिषदेसाठी पाठवले. तसेच त्यातील योग्य असे संशोधन पेपर हे विद्यावार्ता या राष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. National e-conference held at Patpanhale College
या परिषदेच्या अंतिम सत्रामध्ये पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे (Patpanhale College of Arts, Commerce and Science of Patpanhale Education Society)चेअरमन मा. श्री. भालचंद्र चव्हाण साहेब यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या परिषदेचे समन्वयक म्हणून वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॅा. सुभाष खोत यांनी समन्वयक व कला विभाग प्रमुख प्रा. प्रमोद देसाई यांनी सहसमन्वयक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या परिषदेसाठी आय. सी. एस्. महाविद्यालय खेड यांच्याकडून तांत्रिक सहकार्य मिळाले. या परिषदेमुळे पाटपन्हाळे महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होवून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालय जाण्यास मदत झाली. National e-conference held at Patpanhale College