गुहागर, ता. 24 : 12 वी वेस्ट झोन शॉटगन स्पर्धा भोपाळमध्ये नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व दमन या राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रत्नागिरी येथील कार्तिकी मानस देवळेकर हिने शॉटगन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात ज्युनिअर वुमन व सिनिअर वुमन या गटात रोप्य व युथ वुमन गटात कांस्य पदक पटकविले. तर वरा मानस देवळेकर हिने ज्युनिअर वुमन व सिनिअर वुमन या गटामध्ये कांस्य पदक प्राप्त केले. या दोघी बहिणींची दिल्ली येथे होणाऱ्या 68 नॅशनल चॅम्पियनशिप शॉटगन कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. National Championship Shotgun Competition

कार्तिकी व वरा या दोघी क्ले पिजन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोघींना मोहनिष नंदकुमार हिरवे यांनी यश शूटिंग रेंज पेडणे, गोवा येथे प्रशिक्षण दिले. सिध्दांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारके, सचिव आणि राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी, प्रसिद्ध उद्योजक सौरभ मलूष्टे यांनी या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक केले आहे. व पुढील नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. National Championship Shotgun Competition