गुहागर, दि. 09 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ 2020 आणि 2021 प्रदान केले. या वर्षांसाठी 29 उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. Nari Shakti Award 2020 – 2021

महिला सक्षमीकरणासाठीच्या विशेषत: मागास आणि उपेक्षित महिलांसाठी केलेल्या असाधारण कार्याचा गौरव म्हणून 29 महिलांना, अठ्ठावीस पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) प्रदान करण्यात आले. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2020 चा पुरस्कार सोहळा 2021 मध्ये होऊ शकला नाही. Nari Shakti Award 2020 – 2021

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी केलेल्या अथक सेवेबद्दल आणि महिलांचा परिवर्तनकारी, सकारात्मक बदलाचे उत्प्रेरक म्हणून सन्मान करण्यासाठी महिला आणि संस्थांना महिला आणि बाल विकास मंत्रालय नारी शक्ती पुरस्कार प्रदान करतात. Nari Shakti Award 2020 – 2021

2020 च्या पुरस्कृत महिला 2021 च्या पुरस्कृत महिला
अनिता गुप्ता – बिहार अंशुल मल्होत्रा – हिमाचल प्रदेश
आरती राणा – खेरी- उत्तर प्रदेश बतूल बेगम – राजस्थान
डॅा. इला लोध – त्रिपुरा कमल कुंभार – महाराष्ट्र
जया मुथु & तेजम्मा – तामिळनाडू मधुलिका रामटेके –
जोधैया बाई बैगा – मध्य प्रदेश नीना गुप्ता – बंगाल
मिरा ठाकूर – पंजाब निरजा माधव – उत्तर प्रदेश
नसिरा अख्तर कुलगाम –जम्मू & कश्मिर निरंजनाबेन मुकुलभाई कलार्थी –गुजरात
निवृती राय – कर्नाटक पुजा शर्मा – हरयाणा
पद्मा यांगचन – राधिका मेनन –कर्नाटक
संध्या धर –जम्मू & कश्मिर सथुपती प्रसन्ना श्री – आंध्र प्रदेश
सायली नंदकिशोर आगवणे – महाराष्ट्र शोभा गस्ती – कर्नाटक
टिफनी बरार – केरळ श्रृती मोहापात्रा – ओडीसा
उषाबेन दिनेशभाई वसावा – गुजरात तागे रिता ताखे – अरूणाचल प्रदेश
वनिता जगदेव बोराडे- थारा रंगस्वामी – तमिळनाडू

