• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

by Mayuresh Patnakar
March 11, 2021
in Old News
17 0
0
प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चार देशांतील लघु कादंबऱ्यामधील जैविक रुपकांवर केले संशोधन

गुहागर : प्राध्यापक रामेश्वर सुरेशराव सोळंके यांना विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली आहे. ते गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत.  नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठद्वारे ते इंग्रजी वाङमयामधील संशोधन करत होते.
विद्या वाचस्पती या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यांनी चार देशातल्या चार लघुकादंबऱ्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये रशियन लेखक निकोलाय गोगोल यांनी 1833 मध्ये लिहिलेल्या द नोझ कादंबरीचा समावेश आहे. ही कादंबरी झारशाहीने केलेली पिळवणूक व त्यानंतर रशियात झालेली क्रांती यावर आधारित आहे. जर्मन लेखक फ्रान्झ काफ्काने 1915 मध्ये लिहिलेल्या द मेटा मार्फोसिस लघु कांदबरीही सोळंकेनी अभ्यासली. या कांदबरीत यांत्रिकरणाचे मुळे मानवी जीवनात होणारे बदल दाखवून देण्यात आले आहेत. भारतीय लेखक ओ. व्ही. विजयन यांनी 1979 मध्ये द वार्ट ही लघु कादंबरी इंग्रजीत लिहिली. द वार्टमध्ये 70 च्या दशकातील भारतीय राजकारणाचा संदर्भ देवून हुकुमशाहीचा कसा उगम होतो त्यावर भाष्य केले आहे. तर अमेरिकन लेखक फिलिप रोथ यांनी 1973 मध्ये द ब्रेस्ट ही लघु कादंबरी लिहीली. या कादंबरीत दुसऱ्या महायुध्दानंतरच्या दिशाहीन अमेरिकन संस्कृतीचे पडसाद उमटतात.
प्रा. रामेश्र्वर सोळंके यांनी या चारही कादंबऱ्यांमधील पात्रांचा तुलनात्मक अभ्यास केला. अर्थात हा शोधनिबंधाचा विषय असल्याने या कांदबऱ्यांमध्ये शब्दबध्द केलेल्या घटना, त्यातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये, पात्रांमध्ये होत जाणारे बदल, समाजातील बदल असा अनेक मुद्द्यांचा अभ्यास प्रा. सोळंके यांनी केला. या कादंबऱ्यांमधील नायकांचा अहंपणा अखेरच्या क्षणी गळून पडतो. ते पराभव स्विकारतात.  पुन्हा एकदा समाजाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतात. याची कारणमिमांसा त्यांनी शोधली. त्यातून व्यक्तिने स्वत:ला समाजापासून वेगळे समजु नये. समाजासोबत राहुन आपले कर्तृत्व सिध्द केले पाहिजे. म्हणजे त्याला एकाकीपणाचा, असुरशिक्षतेची भावना निर्माण होणार नाही.  या निष्कर्षाप्रत ते आले. या संशोधनासाठी नांदेड येथील पिपल्स महाविद्यालयाचे डॉ. डी. एन. मोरे यांनी या शोध निबंधासाठी प्रा. रामेश्र्वर सोळंके यांना मार्गदर्शन केले.
इंग्रजी साहित्यातील त्यांचे संशोधनाला परिक्षकांनी मान्यता दिल्यानंतर विद्यापीठाने प्रा. रामेश्र्वर सोळंके यांनी रामेश्र्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती (Doctor of Philosophy)  (पीएचडी) पदवी दिल्याचे जाहीर केले.
प्रा. रामेश्र्वर यांना  विद्या वाचस्पती ही पदवी मिळाल्याचे कळताच मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, मुंबई विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीज (इंग्रजी) चे चेअरमन डॉ. सुधीर निकम, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय मार्गताम्हाने प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत, खरे ढेरे महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.पी. कोरके, प्रा. जी. बी. सानप, प्रा. ए. एस. हिरगोंड, प्रा. एन. एस. भालेराव, प्रा. पी. एम. आगळे, प्रा. पी. एम. कदम, डॉ. ए. ए. कांबळे, प्रा. विराज महाजन, डॉ. आर. जी. गोडसे, प्रा. पद्मनाभ सरपोतदार, प्रा. संतोष जाधव, प्रा. शितल मालवणकर, प्रा. अभिजित यादव, प्रा. रश्मी आडेकर, डॉ. ऋषिकेश गोळेकर, प्रा. वाय. आर. पाटील, प्रा. एम. आर. गायकवाड, श्री. डी. पी. कानडे, यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.