गुहागर, ता. 27 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दि. ०१ मार्च रोजी गुहागर शहरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. Nanasaheb Dharmadhikari Foundation’s cleanliness campaign

या अभियानांतर्गत गुहागर न्यायालय ते बाजारपेठ, श्री व्याघ्रंबरी देवस्थान वरचा पाठ ते महावितरण कार्यालय व सर्व शासकीय कार्यालयात हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात गुहागर तालुक्यातील पाच श्री सदस्य बैठकीतील सदस्य स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत. Nanasaheb Dharmadhikari Foundation’s cleanliness campaign
