• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ कार्यशाळा

by Manoj Bavdhankar
October 26, 2026
in Guhagar
29 1
0
57
SHARES
164
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य अभियानाच्या उद्दिष्टांवर सविस्तर मार्गदर्शन

गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे, विविध विभागांचा सहभाग, जबाबदाऱ्या आणि ग्रामपंचायत स्तरावरील आरोग्यविषयक सद्यस्थिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘My Village, a Healthy Village’ Workshop

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘My Village, a Healthy Village’ Workshop

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी प्रास्ताविकातून अभियानाची माहिती दिली. यावेळी अभियानाचे ध्येय व उद्दिष्टे, सर्व विभागांचा सक्रिय सहभाग, संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्या, कृती दल समिती, पुरस्कार योजना तसेच अभियानांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रांच्या मूल्यांकनाची सद्यस्थिती याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेला सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विकास अधिकारी तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. याशिवाय तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘My Village, a Healthy Village’ Workshop

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सचिन चौगुले, अक्षय गावडे, राजेश जाधव, श्रद्धा पवार, पूजा ससाणे यांच्यासह पंचायत समिती आणि तालुका आरोग्य विभागातील स्त्री व पुरुष परिचर यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी सुरेश आमटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘My Village, a Healthy Village’ Workshop

Tags: ‘My Villagea Healthy Village’ WorkshopGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet14
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.