(भाग 6)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
आपण मधुमेह (Diabetes) म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, कोणाला होवू शकतो याबाबत थोडक्यात चर्चा यापूर्वी केली आहे. आपले शरिर आपल्याला होणाऱ्या आजाराची आधी कल्पना देते. फक्त त्यासाठी आपण आपल्या शरिराजवळ, मनाजवळ संवाद साधला पाहिजे. माझी वाटचाल मधुमेहाकडे आहे का हे आपण आपल्याशी संवाद साधून लक्षात घेवू शकतो.
जरा स्वस्थ व्हा आणि खालील प्रश्र्न आपल्याच मनाला, शरिराला विचारा . (What is your Lifestyle)
१ माझ्यावरचा कामाचा बोजा वाढला आहे का?
२ मी सतत ताणतणावात आहे का?
३ मला पुरेशी झोप मिळत नाही का?
४ माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित आहेत का?
५ मी दैनंदिन जीवनात फास्ट फुड, जंक फुड खातो का?
६ मी दारू, कोल्डड्रिंक पितो का?
७ मी सतत बसून काम करतो का?
८ मी माझे मन आणि शरिर प्रसन्न, सतेज ठेवण्यासाठी व्यायाम करतो का?
९ मी लठ्ठ आहात का? (BMI २५ पेक्षा जास्त)
वरील प्रश्र्नांची उत्तरे जर ‘होय’ असतील तर तुम्ही मधुमेही (Diabetic) असू शकता, होवू शकता.
घाबरुन जावू नका. वेळीच खाली दिलेल्या तपासण्या करून घ्या.
1. BMI अपेक्स हॉस्पिटल ला मोफत काढला जातो.
2. दर ३ ते ६ महिन्यांनी रक्तातील साखर (BSL) तपासणे गरजेचे आहे.
3. वर्षातून एक वेळा ग्लुकोज टोलरंस टेस्ट (GTT) करा.
4. HBA1C (glycosylated hemoglobin) तपासून घ्या.
वरील सर्व तपासण्या अपेक्स हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपलब्ध आहेत.
शासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते, डॉक्टर, CA, त्याचप्रमाणे सतत धावपळ, प्रवास, ताणतणाव सहन करणाऱ्या व्यक्तींनी आहार, व्यायाम व निद्रा यावर लक्ष द्यावे.
काही ठराविक प्रश्न व त्यांची उत्तरे याप्रमाणे (FAQ)
प्रश्न- मी जास्त गोड खातो, मला डायबेटीस होईल का?
उत्तर – जास्त गोड खाण्याने डायबेटीस होतोच असे नाही, परंतु होण्याची शक्यता प्रत्येकालाच आहे. वर लिहिलेल्या गोष्टींचे पालन करावे.
प्रश्न- आमच्या घरात कोणाला डायबेटीस नाही, परंतु मला होईल का?
उत्तर – अनुवांशिकता नाही, परंतु होण्याची शक्यता प्रत्येकालाच आहे. वर लिहिलेल्या गोष्टींचे पालन करावे.
प्रश्न- मी लट्ठ आहे, मला डायबेटीस होईल का?
उत्तर – लट्ठ माणसाना डायबेटीस होण्याची शक्यता असते, परंतु होईलच असे नाही.
प्रश्न- मी बारीक आहे, पण मला डायबेटीस का आहे ?
उत्तर – जाड व बारीक यावर सर्वस्वी डायबेटीस होणे अवलंबून नाही. इतर अनेक बाबी आहेत ज्यामुळे डायबेटीस होतो.
प्रश्न- मला काही त्रास नाही तरी मी तपासण्या कराव्यात का?
उत्तर – होय. आजार झाल्यानंतर अथवा टोकाला पोहचल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा वेळीच सावध होऊन तपासण्या कराव्यात
(prevention is better than cure)
भाग 6…(क्रमशः)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
https://guhagarnews.com/free-camp-for-diabetic-patients-at-apex-hospital-ratnagiri/
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/