प्राचीन विरुपाक्ष मंदिरात श्रावण मासानिमित्ताने वादन सेवेचे आयोजन
गुहागर, ता. 31 : पनवेलमध्ये श्रावण मासानिमित्त विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात. यंदा एक विशेष उपक्रम पनवेलमधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर येथे होत आहे. विरुपाक्ष देवस्थान ट्रस्टचे सचिव गुरुनाथ उर्फ संदीप लोंढे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा उपक्रम म्हणजे १३ ऑगस्ट श्रावण मास प्रारंभ ते १० सप्टेंबर रोज (श्रावण सोमवार सोडून) वादन सेवा. या उपक्रमातुन २४ हुन अधिक कलाकार आपली कला महादेवांच्या समोर सादर करत आहेत. रोज एका कलाकाराचे वादन त्यामध्ये सनई, संवादिनी, तबला, पखवाज, सतार, संतूर, व्हायोलिन, बासरी अशी वाद्ये वाजवणारे कलाकार समाविष्ट आहेत. Musical art will be presented in Panvel
या पूर्ण कार्यक्रमाची आखणी, नियोजन हे किरण बापट यांनी केलं आहे. देवस्थानचे अध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे आणि ट्रस्टचे सर्व सदस्य यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. ह्या उपक्रमाचा उद्देश हा नवीन वादक कलाकार पुढे यावेत आणि त्यांना योग्य त्या संधी मिळाव्यात असा आहे. या उपक्रमाचा सांगता सोहळा १० सप्टेंबर रोजी विशेष मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. Musical art will be presented in Panvel
संगीत रसिकांनी आवर्जून या पूर्ण महिनाभर चालणाऱ्या वादन सेवेला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती. वादन सेवेची वेळ ही संध्याकाळी ७ ते ७.३० अशी आहे. Musical art will be presented in Panvel
