• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणात “संगीत ताजमहाल” नाट्यप्रयोग

by Guhagar News
October 28, 2023
in Ratnagiri
120 1
0
चिपळुणात “संगीत ताजमहाल” नाट्यप्रयोग
236
SHARES
673
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इंदिरा गांधी नाट्यगृहात २ नोव्हेंबर रोजी रात्रौ ९:३० वाजता

गुहागर, ता. 28 : चिपळूण येथील इंदिरा गांधी नाट्यगृह येथे २ नोव्हेंबर रोजी रात्रौ ९:३० वाजता “संगीत ताजमहाल” संगीत नाटकाचे आयोजन केले आहे. या दोन अंकी नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून वैयक्तिक १० पारितोषिकांसह एकूण ११ पुरस्कार या नाटकांने मिळवले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत एक हाती सत्ता मिळवताना या संगीत नाटकाने  रसिकांचा मतदार संघ महाराष्ट्रभर पोहोचविला आहे. “Music Tajmahal” theater experiment in Chiplun

या नाटकाचा प्रयोग सर्व नाट्यप्रेमी रसिकांनी जसा चतुरंग आयोजित संगीत मंदारमाला या पुरस्कार विजेत्या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच या नाटकलाही उदंड प्रतिसाद द्यावा, असे कळकळीचे आवाहन खल्वायन रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. प्रवेशिका सुनिल जोशी यांच्या झेरॉक्स व स्टेशनरी दुकानात कोर्ट कचेरीजवळ, नगर परिषद समोर नातूज्‌‍ टी- 8275431654, सौ. स्मिता करंदीकर रेकॉन प्लाझा, प्रभात रोड यांच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच दि. ३० ऑक्टोबरपासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे तिकीट विक्री सुरू होत आहे. “Music Tajmahal” theater experiment in Chiplun

संगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीचा एक खास नाट्यप्रकार आहे. ३१  ऑक्टोबर १८८० या ऐतिहासिक दिवशी मराठी रंगभूमीवर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो… या नांदीचे सूर उमटले आणि किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या  पहिल्या वहिल्या संगीत नाटकाचे पदार्पण झाले. त्यानंतर वैविध्य असलेल्या संगीत नाटकांची परंपरा सुरु झाली. संगीत नाटकांमुळे  प्रेक्षकांना गद्य आणि पद्य, अशी मेजवानी मिळाली. तीन वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५९ वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्यस्पर्धा इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आली होती. जवळपास २६ संगीत नाटकांचा संच या स्पर्धेत उतरला होता. बऱ्याचशा संस्थांनी उत्तम सादरीकरण केले. परंतु नवनिर्मिती असलेले एक नाटक मात्र संपूर्ण स्पर्धेत स्वतःचा ठसा उमटवून गेले ते नाटक म्हणजे रत्नागिरी येथील ‌‘खल्वायन’ संस्थेची निर्मिती असलेले ‌‘संगीत ताजमहाल’. उत्तम संहितेला दर्जेदार दिग्दर्शन, सशक्त अभिनय, तसेच सुमधूर चाली आणि सहज सुंदर काव्य या सगळ्या गोष्टींची जोड असेल तर अव्वल दर्जाची कलाकृती तयार होते याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संगीत ताजमहाल!  म्हणूनच प्रेक्षकांच्या मनातही या ताजमहालने घर केले आहे. “Music Tajmahal” theater experiment in Chiplun

Tags: “Music Tajmahal” theater experiment in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.