चतुरंग प्रतिष्ठानlतर्फे दि. ४,५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजन
गुहागर, ता. 29 : कोकणातला गणेशोत्सव आणि शिमगोत्सव…! आणि या उत्सवामधला एक अविभाज्य घटक म्हणजे सादर होणारे नाटक. प्रत्येक गावामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या उत्सवांमुळे कोकणाला एक सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा लाभला आहे. अश्या कलासंपन्न कोकणात, चिपळूण येथे दीर्घ काळानंतर सलग ३ दिवस ३ संगीत नाटकांचे सादरीकरण असलेल्या संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे. Music Drama Festival at Chiplun
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये शनि, रवि आणि सोम दि. ४,५ आणि ६ ऑक्टोबर रोजी दररोज रात्री ९ वाजता आपल्याला संगीत नाटकाचा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय विजेती दर्जेदार नाटके आपल्याला बघायला मिळतील. दरवर्षी काहीतरी नवीन करायचे या हेतूने गावातील (आणि शहरातील चाकरमानीसुद्धा) ही परंपरा आजही टिकवून आहेत. Music Drama Festival at Chiplun

गुहागर तालुक्यातील परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे हे त्याचेच एक ठळक उदाहरण आहे. सलग ३ वर्षे संगीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवले आहे. याच संस्थेची २ नाटके – संगीत बावनखणी, शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी तर संगीत जय जय गौरीशंकर रविवार, ५ ऑक्टोबर रोजी या नाट्य महोत्सवात सादर होणार आहे. रविवारी या सर्व कलाकार चमूचा गौरव सन्मान सोहळा डॉ. गिरीश ओक आणि विजय केंकरे यांच्या विशेष उपस्थितीत साकार होणार आहे. कोकणातील अनेक गुणी कलाकारांसह सर्वांनी सादर केलेले नाटक म्हणजे गोष्ट संयुक्त मानापमानाची, सोमवार, ६ ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमा) रोजी सादर होणार आहे. Music Drama Festival at Chiplun
या तीनही नाटकांचा एकत्रित तिकीट दर रु. ७५०, ६००, ४५० असा आहे. तिकीट विक्री उत्तम प्रतिसादात सुरु झालेली आहे. तिकीट ऑनलाईन – itsmyshow.in वर सुरु आहे. तसेच फोन बुकिंगसाठी योगेश कुष्टे – 9423293951 यांच्याशी संपर्क करावा. दर्दी संगीत नाट्य रसिकांनी या सुवर्णसंधीचा आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान कडून करण्यात येत आहे. Music Drama Festival at Chiplun