श्री देव व्याडेश्वरमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी; स्पर्धकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी
गुहागर, ता. 26 : गेल्या ४५ वर्षापासून सुरू असलेली दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा यंदा गुहागर केंद्रावर येत्या रविवारी (ता. २९) रोजी आयोजित करण्यात आली आहे. कलाविकास रंगभूमी, गुहागर या संस्थेच्या सहकार्याने स्पर्धेची प्राथमिक फेरी गुहागर येथील श्री व्याडेश्वर देवस्थान हॉलमध्ये सकाळी १० वाजता होईल. Music concert in Guhagar
ही स्पर्धा मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व राज्यांतील विद्यापीठांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त कलावंत तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तिगीत किंवा अभंग सादर करता येईल. Music concert in Guhagar
गाण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी आहे. हार्मोनियम, तबला आणि तानपुरा इतकीच वाद्ये साथ-संगतीसाठी वापरता येतील. हार्मोनियम, तबला या वाद्यांची आणि वादकांची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल. स्पर्धक स्वखर्चाने स्वतःच्या पसंतीचे साथीदार आणू शकतात. गीतांच्या लिखित शब्दांची प्रत किंवा भ्रमणध्वनी समोर ठेवून गाता येणार नाही. स्पर्धकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. Music concert in Guhagar
प्राथमिक स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी २५ डिसेंबरला दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात घेण्यात येईल. अंतिम विजेत्याला प्रथम पारितोषिक दहा हजार रोख, फिरता चषक, द्वितीय पारितोषिक सात हजार रोख व प्रशस्तीपत्रक आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. Music concert in Guhagar
