• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काजुर्ली-वीर पुलासाठी हालचालींना वेग

by Mayuresh Patnakar
September 23, 2026
in Guhagar
61 1
0
Movement accelerates for Veer-Kajurli bridge
121
SHARES
345
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुलाचा सुमारे ३५ गावांसह २८ हजार ग्रामस्थांना लाभ

गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील काजुर्ली व चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला आहे. या पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन मंत्रालयस्तरावरून करण्यात आलेल्या सूचनांनुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रस्तावित ठिकाणी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय जावळे यांच्यासह स्थानिक, मुंबईकर ग्रामस्थांनी मंत्रालय पातळीपर्यंत पाठपुरावा केल्याने पुलाच्या उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. Movement accelerates for Veer-Kajurli bridge

वीर-काजुर्ली गावांना जोडण्यासाठी कापशी नदीवर पूल उभारण्याची मागणी १९९९ पासून करण्यात येत आहे. याबाबत २००० पासून पत्रव्यवहारही सुरू आहे. सध्या या दोन्ही गावांदरम्यान नदी ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. प्रस्तावित पुलामुळे हा प्रवास अधिक सुलभ होणार असून चिपळूण, गुहागर, संगमेश्वर तसेच रत्नागिरी तालुक्यांना आणि मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. प्रस्तावित कापशी नदीवरील पुलाची लांबी सुमारे १२० मीटर, तर उंची व रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्याचे नियोजन आहे. पुलासाठी दुपदरी रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून उंच पातळीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पावसाळ्यातील नदीच्या वाढत्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मार्गावरील या पुलामुळे वीर, काजूर्ली परिसरातील ३५ पेक्षा अधिक गावांसह सुमारे २८ हजारांहून अधिक लोकसंख्येला थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे. Movement accelerates for Veer-Kajurli bridge

चिपळूण रत्नागिरी प्रवासासाठीही हा पर्यायी व महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. प्रस्तावित पूल अस्तित्वात आल्यास मुंबई-रत्नागिरी मार्गावरील प्रवासासाठीचा अतिरिक्त वळसा वाचण्यास मदत होणार आहे. या पुलामुळे परिसरातील पर्यटन, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि बाजारपेठेच्या दृष्टीनेही मोठी सुविधा निर्माण होणार आहे. वीर परिसरातील पर्यटनस्थळे, देवस्थाने, शैक्षणिक संस्था, रुग्णालये तसेच चिपळूण, रत्नागिरी, सावर्डे आदी बाजारपेठांशी संपर्क अधिक सुलभ होईल. विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे. Movement accelerates for Veer-Kajurli bridge

सहाय्यक अभियंता हर्षवर्धन पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी नदीवरील दोन जागांची पाहणी केली. पुलाच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय सोनू जावळे, वीर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, मयुरेश गावणंग, परीक्षित पावसकर, विशाल वीरकर, जयंत वीरकर, काजुर्लीचे पप्पू साळवी यांच्यासह वीर, पूर्वे, शिरंबे, वहाळ, पिलवली, तोंडली, अबिटगाव गावांच्या सहकार्यातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. Movement accelerates for Veer-Kajurli bridge

तब्बल २९ वर्षांपासूनची वीर-काजुर्ली ग्रामस्थांची मागणी -कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पूल झाल्यास या परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पाहणीमुळे प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तब्बल २९ वर्षांपासूनची वीर-काजुर्ली ग्रामस्थांची मागणी प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.- संजय जावळे, पंचायत समिती सदस्य, वीर

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMovement accelerates for Veer-Kajurli bridgeNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.