राज्यात अन्यत्र अपुरा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागवला अहवाल
गुहागर, ता. 09 :संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा अपुरा साठा असताना केवळ जालना जिल्ह्यात सर्वांधिक लस कशी पोचली याचा शोध घ्यावा. असे पत्र केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शीळ यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांना पाठवले आहे. एका इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्राने जालना जिल्ह्यातील लसींबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने नेमके काय घडले याचा अहवाल पाठविण्याची विनंती विकास शील यांनी केली आहे.
Find out how the highest number of vaccines reached Jalna district only when there is insufficient stock of vaccines in the whole of Maharashtra. Such a letter was sent by Vikas Sheel, Additional Secretary, Ministry of Health and Family Welfare, Government of India to Additional Secretary, Public Health Department Maharashtra State Dr. Pradip Vyas. An English language newspaper had published a report on vaccines in Jalna district. Vikas Sheel has requested to send a report on what exactly happened in this regard.
इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेस मध्ये 5 मे रोजी महाराष्ट्रात लस पुरवठा कमी असताना आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे (Maharashtra Health Minister Dr. Rajesh Tope) यांच्या जिल्ह्याल जादा डोस या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात लसीचे डोस अत्यल्प प्रमाणात वितरीत होत असताना आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याच्या वाट्याला 17 हजार डोस आलेले असताना 60 हजार डोसांचे वितरण झाले होते. 7 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्याने बंद पडली. 31 मार्चच्या दिवशी जालना जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या केवळ 773 होती. महाराष्ट्रात सर्वात कमी कोरोना रुग्ण असलेला हा जिल्हा होता. तसेच जालना जिल्ह्यात केवळ 1000 लसीकरण झाले होते. लसीकरणातही सर्वात कमी लसीकरण करणाऱ्या 10 जिल्ह्यात जालनाचा क्रमांक होता. या पार्श्र्वभुमीवर जालना जिल्ह्याला औरंगाबाद मधून 60 हजार लसींचा पुरवठा 1 एप्रिलला करण्यात आला. जालना जिल्ह्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत प्रतिदिन 3 ते 5 हजारावर पोचले. अन्य जिल्ह्यातून लसीच्या पुरवठ्याविषयी ओरड होवू लागली तेव्हा जालना जिल्ह्याने शेजारच्या जिल्ह्याना लस पुरवठा केला. (इंडियन एक्सप्रेसमधील बातमीवरुन साभार)
इंडियन एक्सप्रेसमधील याच बातमीचा आधार घेवून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शीळ यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांना 7 मे रोजी पत्र पाठवले आहे. त्या पत्रात विकास शील म्हणतात की, कोवीन ॲपवरच्या (Cowin App) आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात जानेवारी 2021 मध्ये 4794 डोस देण्यात आले. फेब्रुवारी 2021 मध्ये 12016 व मार्च महिन्यात 53085 डोस देण्यात आले. तर एप्रिल महिन्यात 1 लाख 34 हजार 290 डोस देण्याच आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने इंडियन एक्सप्रेसमधील बातमी आणि कोविनवरील माहिती लक्षात घेवून जालनामध्ये असे नेमके काय घडले याचा अहवाल पाठवावा.