• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला

by Guhagar News
June 19, 2025
in Maharashtra
88 1
0
Monsoon has engulfed Maharashtra
172
SHARES
492
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुढील 5 दिवस धो धो पाऊस; IMD चा अंदाज काय ?

गुहागर, ता. 19 : मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रीय झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडत आहे. Monsoon has engulfed Maharashtra

Minor girl kidnapped from Ratnagiri

मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे राज्यभरात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज काही ठिकाणी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. Monsoon has engulfed Maharashtra

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. साधारणपणे 15 ते 16 जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेनुसारच मौसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला. याचबरोबर झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Monsoon has engulfed Maharashtra

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMonsoon has engulfed MaharashtraNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.