• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पांगारी तर्फे वेळंब येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

by Ganesh Dhanawade
October 3, 2023
in Guhagar
162 2
0
MNS workers' meeting concluded
319
SHARES
910
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील पांगारी तर्फे वेळंब येथील श्री खेम झोलाई देवस्थान सहाण येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितल्या. पांगारी तर्फे वेळंब येथील मनसे शाखेच्या वतीने उपस्थित पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. MNS workers’ meeting concluded

या मेळाव्यासाठी गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उप जिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर मुंबई, कमिटीचे अध्यक्ष सुरेश यशवंत खांबे, गाव कमिटीचे अध्यक्ष शिवाजी खांबे, पांगारी पँथर्स संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. MNS workers’ meeting concluded

यावेळी पांगारी तर्फे वेळंब गावातील नागरिकांनी मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडे गावातील अनेक समस्या व व्यथा मांडल्या. पांगारी तर्फे वेळंब गावातील रस्ता अपुरा असल्यामुळे एसटी व इतर वाहने गावात येत जात नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांना प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. खांबेवाडीतील महापुरुष मित्र मंडळ धाकटाघरेना सभागृह तसेच गंगाराम खांबे, प्रकाश कांबळे, संदिप खांबे, सचिन खांबे, अजित खांबे यांच्या घराजवळील धोकादायक विद्युत खांब बदलण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे, असे नागरिकांनी सांगितले. MNS workers’ meeting concluded

यावर बोलताना प्रमोद गांधी यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात दळणवळणाची साधने अपुरी आहेत. अनेक गावांत रस्ते आहेत, पण त्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामूळे नागरीकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. मनसेच्या माध्यमातून यावर नक्कीच आवाज उठविला जाईल, अशी ग्वाही त्यांना दिली. विनोद जानवळकर म्हणाले कि, गावाचा विकास म्हणजे रस्ते, पाखाडी नाहीत तर येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची काळाची गरज आहे. MNS workers’ meeting concluded

यावेळी पांगारी तर्फे वेळंब येथील खांबेवाडी , तांबेवाडी, गिजेवाडी, वणेवाडी, फौजदार वाडी, भुवडवाडी येथील मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मनसेचे कार्यकर्ते संतोष खांबे, विभाग अध्यक्ष संजय भुवड शाखाध्यक्ष सुनिल भुवड उपशाखा समिर भुवड, गंगाराम खांबे, अनंत भुवड, अनोत तांबे, बबन खांबे, रणजित खांबे, भरत खांबे, वसंत कांबळे, सुरेश खांबे, प्रमोद खांबे, मोहक खांबे, संदिप वने, महेश भुवड, सुनिल खांबे, विजय खांबे, सुभाश खांबे, रमेश खांबे, रुपेश खांबे, मंगेश खांबे, अजिंक्य गुरव, विजय रहाटे उपस्थित होते. MNS workers’ meeting concluded

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNS workers' meeting concludedNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.