संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 28 : हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगारतळी शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ता वेदांत देवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या प्रयत्नातून नियुक्ती तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. MNS Shringartali City President Vedant Devlekar

यावेळी नूतन शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर यांनी सांगितले की, मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराला प्रेरित होऊन मी लहानपणापासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत आहे. शृंगारतळी सारख्या मोठ्या शहराची जबाबदारी माझ्यावर आली असून ती जबाबदारी सर्व मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असेल. या शहरातील युवकांना मनसे पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचा सदोदित प्रयत्न करेन. जास्तीत जास्त मनसे पक्ष कसा वाढेल याकडे माझा जास्त भर असून मनसेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. निवड झाल्यानंतर अनेक तरुणांनी वेदांत देवळेकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. MNS Shringartali City President Vedant Devlekar
