गुहागर, ता. 09 : पेठमाप, चिपळूण येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी 30 गुंठे क्षेत्रात लावलेल्या 700 शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडीची पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. कोकणात भरपूर पाऊस पडत असताना शेवगा शेती हा नवीन प्रयोग केलेला आहे, तो प्रयोग यशस्वी करा आणि त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्या संदर्भातही मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation
भास्करशेठ हे स्वतः शेतकरी, शेतीतले जाणकार असल्यामुळे शेवग्यासाठी लागणाऱ्या खतव्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले, येणाऱ्या अडचणींची, वानर, माकड यापासून होणाऱ्या उपद्रवाची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वानर, माकड पकडण्यासाठी रुपये सहाशे मानधन जनतेसाठी ठेवले आहे, त्याची सविस्तर माहिती दिली. आमदार भास्करशेठ जाधव यांच्यासोबत नगरसेवक फैसल कासकर, नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर जफर कटमाले उपस्थित होते. MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation
