आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता
गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर भाजपचा खरा चेहरा देशातील जनतेसमोर आलेला आहे. हा भाजपचा फसवा आणि लबाड चेहरा महाराष्ट्राला दाखविण्याचे काम आम्ही करु. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यानंतर चिपळूण येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (MLA Bhaskar Jadhav appointed as spockperson of Shvi Sena. In PRESS MLA Bhaskar Jadhav said We will show this deceitful face of BJP to Maharashtra.)
आमदार भास्कर जाधव यांची आज शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. 10 दिवसांपूर्वीच त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाली. याबद्दल पत्रकार परिषदेच्या सुरवातीला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. ते म्हणाले की, माझ्या कार्यशैलीचा अभ्यास करुनच मला पदे दिली गेली. पक्षाचा प्रवक्ता होणं ही फार मोठी जबाबदारी आहे. सध्या एका पक्षाकडून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता, बेछुट आणि धादांत खोटे आरोप नित्यनेमाने, एका सुरात, ठरवून एका साचामध्ये विशेष करुन भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहे. आता पक्षाने प्रवक्ता म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शाब्दीक हल्ले फक्त तुम्हालाच करता येत नाहीत. आम्ही देखील किती ताकदीने हे हल्ले परतवु हे तुम्हाला दिले. महाराष्ट्रातील सत्ता हातामधुन गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे काही पदाधिकारी कसे नैराश्यातून आणि वैफल्यग्रस्त होवून आरोप करत आहेत. हे सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रातला आम्ही देशाला दाखवून देवू,. (Leader of Opposition Devendra Fadnvis, Leader of Opposition Pravin Darekar, BJP Pradesh President Chandrakandada Patil making baseless allegations on Shiv Sena and State Government.)
मे महिन्यात ५ राज्यातील निवडणुकांच्या निकालात भाजपचे पूर्णपणे पानिपत झालेले असेल. तेव्हा बेछुट आरोप करणारी, वैफल्यग्रस्त पार्टी म्हणून भाजप सर्वांसमोर आलेली दिसेल. (In the Month of May 2021, BJP will be completely defeated in the results of the elections in 5 states. Then the BJP will come out as a failed party, making baseless allegations.)
मंदबुध्दी नेता
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी विक्रांत जाधव अध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या टिकेलाही उत्तर दिले. आमदार भास्कर जाधव म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात आता भाजपमध्ये कोणताही दमदार नेता राहीलेला नाही. माझे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने कोणी माझ्यावर टिका करत नाहीत. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद विक्रांत जाधव यांना मिळाल्यावर माझ्या मतदारसंघातल्या भाजपच्या फुटकळ, मंदबु्द्धीच्या नेत्याने शिवसेनेवर टिका केली. वास्तविक माझ्यामुळे गुहागर तालुक्याला मंत्रीपद मिळालं. माझ्या रुपाने शिवसेनेला पहिल्यांदा आमदार मिळाला. माझ्या मुलाच्या रुपाने गुहागर तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिळाले. हा गुहागर तालुक्याचा सन्मान आहे. याचे समाधान या नेत्याला वाटायला पाहिजे होते. परंतु त्यांनी टिका केली. त्याला वेळ आल्यावर उत्तर देणार आहे. पण माझ्यासमोर ते टिकतील असे मला वाटत नाही.
शिमगोत्सव आणि बदलणारे आदेश
शिमगोत्सवादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने निघत असलेल्या आदेशांवर बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मुळात शासनाच्या आदेशांचे पालन येथील जनता काटेकोरपणे करत आहे. ग्राम कृती दलांनी प्रशासनासोबत राहुन कोरोना संकटात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शिमगोत्सवामध्ये चार चार आदेश काढण्यापूर्वी तारतम्य बाळगायला पाहिजे. आदेश काढण्यापूर्वी आमच्यासारखे जबाबदार, अनुभवी लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी यांचे मत जाणून घ्यायला हवे होते. प्रत्येकवेळी काढलेल्या आदेशांमुळे काय होईल याचा लेखाजोखा घ्यायला हवा होता. कोरोना संकटात सारा गाव एकत्र आला होता. एकरुप झाली. गाव एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहेत. शासकीय आदेशांचे पालन करुन ग्रामस्थ शिमगोत्सव साजरा करत आहेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या दर चार दिवसांच्या बदलणाऱ्या निर्णयांमुळे कदाचित गावागावात वाद होण्याची शक्यता आहे. कदाचित रुढी परंपरांवरुन, मानापानावरुन मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजासमाजामध्ये दुहीसुध्दा निर्माण होऊ शकते. अशी भिती मला वाटत आहे. माझी जिल्हावासीय ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे की, आत्तापर्यंत जसा संयम पाळलात तसाच सयंमाने शिमगोत्सव साजरा करा. तुम्ही जो निर्णय घेतला आहात त्याच्याशी कायम रहा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जरी सारखे बदलत असले तरी तुम्ही तुमचे भुमिका, निर्णय बदलु नका. तुम्ही तुमच्या प्रथा परंपरांसंदर्भात जो निर्णय घेतला असाल त्याच्याशी ठाम रहा. आणि गावामध्ये कोणत्याही प्रकारचे वादंग होणार नाही. याची काळजी घ्या.