• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

by Manoj Bavdhankar
September 26, 2021
in Old News
18 1
1
वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद 25 सप्टेंबरला दाखल केली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास थेट प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी हाती घेतला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार वेलदूरमध्ये रहाणारी श्रुतिका विजय पड्याळ ही 22 वर्षांची तरुणी 21 सप्टेंबर 2021 ला सकाळी 7 वा. घरातून बाहेर पडली. घरच्यांनी सायंकाळ पर्यंत श्रुतिका घरी येईल म्हणून वाट पाहीली. मात्र श्रुतिका घरी परत आली नाही. अखेर 25 सप्टेंबरला विजय पड्याळ यांनी फिर्याद दाखल केली.

22 वर्षांची तरुणी बेपत्ता होवूनही 5 दिवसांनंतर वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने अनेक प्रश्र्न उपस्थित होतात. सदर तरुणीने घरच्यांचा विरोध पत्करुन विवाह केला आहे का. सदर तरुणीचे वडील महावितरण कंपनीमध्ये नोकरीला आहेत. सध्या त्यांची नोकरी पडवे, तवसाळ परिसरात असल्याने ते अधुनमधुन घरी येतात. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष काही घडले म्हणून तरुणी घरातून निघुन गेली का. अन्य कोणत्या कारणांमुळे तरुणी बेपत्ता झाली आहे. अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
राज्यात मुलींवर घडत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीसांनी ही बाब गंभीरपणे घेतली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक (सहाय्यक पोलीस निरीक्षक) बी. के. जाधव स्वत: करीत आहेत.
या फिर्यादीसंदर्भात वेलदूरमधुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कमी लोकसंख्येचा गाव असूनही गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यापर्यंत विषय पोचल्याने रविवारी रात्री या संदर्भात गावातील काही मंडळी सदर कुटुंबाकडे माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Tags: Breaking NewsGirlGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMissingNews in GuhagarNews in Marathiगुहागरगुहागर न्यूजगुहागरमधील बातम्याटॉप न्युजतरुणीताज्या बातम्याबेपत्ताब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.