गुहागर तालुक्यातील 30 कामे मंजूर; शिवसेनेकडुन भुमीपुजन
गुहागर, ता. 30 : उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमत्री मा.उदय सामंत यांनी जनसुविधा योजनेच्या माध्यमातुन गुहागर तालुक्याला रुपये दोन कोटी दहा लाख पन्नास हजार (2,10,50,000) रुपयांचा निधी दिला आहे. त्यातील विकास कामांपैकी काजुर्ली, कोळवली, कुडली व मासु या गावातील कामांचे भुमीपुजन नुकतेच शिवसेना गुहागरच्या वतीने करण्यात आले. Minister Samant gave 2,10,50,000/-
गुहागरचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मागितला होता. त्यामध्ये गुहागर मुंढर मेन रोड ते युवराज आगरे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख, मुंढर आगरेवाडी लांजेकरवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, मुंढर शिरबावाडी चाळकेवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, मुंढर बौध्दवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, पालशेत आगडी मंदिर रस्ता डांबरीकरण करणे 8 लाख, पालशेत आगरेवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, वरवेली भुवडवाडी बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे 8 लाख, कोंडकारुळ गंगामाता रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, अंजनवेल ओमेश किल्लेकर घर ते भोईवाडा रस्ता तयार करणे 5 लाख, धोपावे मुख्य रस्ता ते खारवीवाडी ब्रीज रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, आरे साईनाथ कळझुणकर घर ते रघुवीर घाडे घरापर्यंत रस्ता तयार करणे 8 लाख, विसापूर कारूळ मुख्य रस्ता ते उंबरेवाडी सहाणेपर्यंत रस्ता तयार करणे 8 लाख, पांगारी सडयेवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, मळण गुरववाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, मळण पाखाडवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, जामसूत कुंभारवाडी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, जामसूत जांभुर्णेवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, जामसूत ग्रामपंचायत ते सहाणवाडी रस्ता डांबरीकरण करणे 8 लाख, वेळणेश्वर स्मशानभुमी सुशोभिकरण व संरक्षण भिंत बांधणे, 5 लाख, काजुर्ली मेन रोड ते गोणबरेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, आरे लक्ष्मीनारायण मंदिर ते महेश भोसले घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, कुडली आंबेकर नगर ते ब्राम्हणवाडी रस्ता संरक्षण भिंतीसह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 12 लाख, पालशेत अण्णा विलणकर मार्ग शिगवणवाडी रस्ता डांबरीकरण करणे 7 लाख, कोळवली बौध्दवाडी ते नळीचीवाडी रस्ता तयार करणे 7 लाख, कोळवली ब्राम्हणवाडी ते गवाणवाडी ते पानबुडी ग्रामा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख, मासू येथे ग्रामपंचायत नविन कार्यालय बांधणे 15 लाख, पालपेणे मुख्य रस्ता ते तेलीवीडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, कोंडकारूळ कडा ते पऱ्याचा वड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख, आबलोली पांचाळवाडी येथे स्मशानशेड बांधणे 3.50 लाख, निवोशी पोमेंडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 8 लाख रूपये या कामांचा समावेश होता. त्यापैकी काजुर्ली, कोळवली, कुडली व मासु या गावातील कामांचे भुमीपुजन युवासेना जिल्हा प्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई, शिवसेना जिल्हा संघटक राहुल बामणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, विधानसभा क्षेत्रप्रमुख आनंद भोजने व तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्या हस्ते करण्यात आले. Minister Samant gave 2,10,50,000/-
या भुमीपुजन कार्यक्रमास जिल्हा युवा संघटक अमरदिप परचुरे, युवासेना तालुका प्रमुख रोहन भोसले, तालुका सचिव संतोष आग्रे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, समन्वयक नारायण गुरव, उपतालुकाप्रमुख भाऊ काजरोलकर, विभागप्रमुख व कोळवली सरपंच संतोष सावरकर, शाम आठवले, सरपंच कुडली मुजिब जांभारकर, ठेकेदार मोहन चव्हाण यांसह ग्रामस्थ गावकर व महिलामंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोळवली सरपंच, मासु सरपंच व कुडली सरपंच यांनी सर्वांना धन्यवाद देवुन आभार मानले. Minister Samant gave 2,10,50,000/-