दौरा रद्द; निरामय व माझी रत्नागिरीचा घेणार होते आढावा
गुहागर, ता. 15 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 15) गुहागरला हुलकावणी दिली. नियोजनाप्रमाणे शनिवारी (ता. 15) निरामय रुग्णालय परिसर पहाणी आणि तालुक्यातील माझी रत्नागिरी माझी जबाबदारी उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी गुहागरला येणार होते. मंत्री येणार म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि आमदार भास्कर जाधव देखील या दौऱ्यात सहभारी होणार होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी कुडाळ दौरा ठरवत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुहागरला हुलकावणीच दिली.
कोरोना (Corona) महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी आता प्रशासन (Government) करत आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम सुरु आहे. गुहागरमधील निरामय रुग्णालयाची इमारत कोरोना महामारीत वापरण्यासाठी मार्च 2020 पासून पर्यंत सुरु आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्र्वभुमीवर निरामय ताब्यात घ्यायचे तर तेथील सद्यस्थितीची पहाणी केली पाहिजे. या उद्देशाने महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी 15 मे रोजी गुहागर दौऱ्याचे नियोजन केले होते.
शासनाकडून सामंत यांचा दौरा प्रसिध्द करण्यात आला. त्याप्रमाणे दुपारी 03.00 वाजता जाकादेवी येथून मोटारीने (भातगाव मार्गे) निरामय रुग्णालय, गुहागरकडे प्रयाण. दुपारी 04.30 वाजता जि.प. अध्यक्ष व आमदार भास्कर जाधव यांच्यासमवेत निरामय रुग्णालयास भेट व पाहणी. सायंकाळी 05.00 वाजता निरामय रुग्णालय संदर्भात व गुहागर तालुका कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 06.00 वाजता पत्रकार परिषद सायंकाळी 06.30 वाजता गुहागर येथून मोटारीने चिपळूण, जि. रत्नागिरी कडे प्रयाण. सांयकाळी 07.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव. रात्रौ 12.00 शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथून मोटारीने चिपळूण रेल्वे स्थानक कडे प्रयाण. पहाटे 12.20 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. असे नियोजन होते.
शुक्रवार, दि. 14 मे रोजी सायंकाळी हे नियोजन संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी शनिवारच्या आपल्या नियोजीत कामांमध्ये बदल केला. शनिवारी 15 मे रोजी सकाळी तीन्ही अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहुन मंत्र्यासोबतच्या बैठकीचे नियोजन करत होते. प्रांताधिकारी प्रविण पवार मंत्र्याच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी शनिवारी (ता. 15 मे) दुपारी 12 वा. आरजीपीपीएल (RGPPL Project) प्रकल्पस्थळी आले. तेथे प्रांताधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची छोटी बैठकही घेतली. निरामय रुग्णालया (Niramay Hospital Building) संदर्भातील कोणत्या अडचणी समोर येवू शकतात याची माहिती घेतली. एकूणच प्रशासकीय स्तरावर मंत्री सामंत यांच्या दौरा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
मात्र दुपारी 1 वाजता अचानक मंत्र्याच्या दौराच बदलला. गुहागर दौरा रद्द झाल्याच्या सूचना संबंधित खात्यांना देण्यात आल्या. शनिवार 15 मे 2021 रोजी दुपारी 04.00 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग कडे प्रयाण असा अधिकृत निरोप आला. खरतरं तोक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) प्रवास 15 मे रोजी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरुन होत आहे. अशा धोकादायक प्रसंगी सिंधुदूर्गचे पालकमंत्री वाहनाने प्रवास करणे योग्य ठरत नाही. तरीदेखील अधिकृत दौरा कसा काय निश्चित करण्यात आला हा प्रश्र्नच आहे. म्हणून रत्नागिरीमध्ये चौकशी केली असता सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंत्री उदय सामंत कुडाळकडे रवाना झाले नसल्याचेही समजले. त्यामुळे गुहागर दौऱ्याला सामंत यांनी हुलकावणी का दिली असा प्रश्र्न सर्वांना पडला आहे.
गुहागर तारीख 15 आज महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुहागर मधील निरामय रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी करणार होते त्यानंतर आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांसमवेत कोरोना केअर सेंटर संदर्भात मिटिंग घेणार होते. त्यानंतर आरजीपीपीएलमधील सावित्री भवनामध्ये तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत कोरोना आणि माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या विषयाचा आढावा घेणार होते. मात्र शेवटच्या क्षणाला मंत्री उदय सामंत यांनी आपला दौरा बदलला आणि ते कुडाळला जाणार असल्याचा अधिकृत निरोप आला. त्यामुळे येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नाराज झाले. सध्या मंत्री उदय सामंत यांनी गुहागरच्या दौऱ्याबाबत हुलकावणी दिली का अशी चर्चा रंगली आहे.
On Saturday (15th May) Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant was to come to Guhagar to inspect the Niramaya Hospital premises and to take a review of my Ratnagiri, my responsibility activity in Guhagar Taluka. But at Last Movement Minister Samant Cancelled their Guhagar Tour.