एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ व एकता नगर यांच्यावतीने आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील जानवळे येथील एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ, एकता नगर जानवळे या मित्र मंडळाचे वतीने अंगणवाडी ते पदवीधर अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चिपळूणकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. हा सोहळा शंकर काशीराम चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महिला, मुलं आणि कार्यकारणीतील सदस्य बहुसंख्येने उपस्थितीत होते. Merit ceremony at Janwale


यावेळी उपस्थितीत ५३ मुलांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. तसेच महिलांचा हि सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर चिपळूणकर, सुधीर कोंडविलकर, दत्ताराम कोंडविलकर, विश्वनाथ कोंडविलकर, संजय कोंडविलकर, संदीप कोंडविलकर, मंगेश कोंडविलकर, दिनेश चिपळूणकर, योगेश चिपळूणकर, जितेंद्र कोंडविलकर, सुभाष कोंडविलकर, किशोर चिपळूणकर, रामदास कोंडविलकर, राजेंद्र कोंडविलकर, रमेश कोंडविलकर, राजेश कोंडविलकर, सुरेश चिपळूणकर, राजेश मनोहर कोंडविलकर उपस्थित होते. Merit ceremony at Janwale