• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वर्गशिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा मानसिक छळ व मारहाण

by Ganesh Dhanawade
August 7, 2026
in Guhagar
138 2
0
Mental harassment of a student by a class teacher
271
SHARES
775
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अंजनवेल बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रकार, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

गुहागर,  ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूल (RGPPL कंपनी) या CBSE शाळेतील एका वर्गशिक्षिकेविरुद्ध विद्यार्थ्याला मानसिक त्रास देणे व मारहाण केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वेलदूर-खोंडवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील पालक निलेश विजय धामणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. Mental harassment of a student by a class teacher

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार निलेश धामणकर यांचे दोन मुलगे प्रणेश व तनिष्क हे अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचा लहान मुलगा तनिष्क हा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. संबंधित वर्गशिक्षिकेचा विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव रागीट व कठोर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मागील शैक्षणिक वर्षात शाळेतील काही पालकांनी शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीबाबत तसेच संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गशिक्षिकेने त्याचा राग तनिष्कवर काढल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून तनिष्कला वर्गातील इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे ठेवत मागील बाजूस एका कोपऱ्यात बसवण्यात येत होते. तसेच, “यही तेरी जगह है” असे ओरडून सांगत त्याचा सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमान केला जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय, “कोई इससे फ्रेंडशिप नहीं करेगा, कोई इसका फ्रेंड नहीं बनेगा” असे सांगून इतर विद्यार्थ्यांना तनिष्कपासून दूर राहण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Mental harassment of a student by a class teacher

दरम्यान, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळा सुटल्यानंतर तनिष्क घरी आला असता तो मोठ्याने रडत होता. पालकांनी त्याची विचारपूस केली असता, “आज मॅडमनी माझ्या पाठीवर जोरजोरात चार-पाच बुक्क्या मारल्या,” असे त्याने सांगितले. लहान वयातील विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण झाल्याने तसेच वारंवार मानसिक त्रास दिल्याने तो मानसिक तणावाखाली गेला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर पालक निलेश विजय धामणकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. Mental harassment of a student by a class teacher

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMental harassment of a student by a class teacherNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet68
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.