संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम म्हणून घोषणा होणे
गुहागर, ता. 14 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची नोंद सरकारी दप्तरी होऊन त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम म्हणून घोषणा होणे हे विश्व् संमेलनाचे एक मोठे उद्दिष्ट असल्याची माहिती नामदेव समाजोन्नत्ती रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी दिली. नामदेव समाजोन्नत्ती रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी आणि चिपळूण तालुका नामदेव शिंपी समाज यांची सभा चिपळूण येथील श्री संत नामदेव मंदिर येथे पार पडली त्यावेळेला ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपाध्यक्ष अनंत टमके, सचिव सचिन हेंद्रे, खजिनदार संदीप वेल्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल सदरे, अनंत टमके उपस्थित होते. Meeting of Namdev Tailor Society

जो व्यवसाय आज बंद होत चाललाय त्याला राजश्रय मिळणे गरजेचे आहे. या अनेक मागणीसाठी दि. 22 तारखेला नागपूर येथे होणाऱ्या विश्व् संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन दत्तात्रय भस्मे यांनी केले. या संमेलना संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून आलेल्या उषाताई पोरे आणि अभय नाझरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच यांनी विश्व् संमेलनात सर्व शिंपी समाजातील पोटजाती एकत्र येऊन आपले देशपातळीवरील प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती दिली. या सभेचे आयोजन चिपळूण समाज बांधव आणि महिला मंडळ यांनी केले होते. प्रणिता कपडेकर यांनी आभार मानले. Meeting of Namdev Tailor Society
