जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे आयोजन
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही (Medicinal Plants Register Competition) स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा ६ वी ते ८वी,९ वी व १० वी ,११ वी व १२ वी अशा तीन गटांत होणार आहे. स्पर्धेचा कालावधी ११ ऑक्टोबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ असा असणार आहे. सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असलेल्या शाळांनाही स्पर्धा आयोजकांतर्फे गौरविले जाणार आहे.
Ratnagiri District Science Teachers Board and JSW Foundation have jointly organized the Medicinal Plants Register Competition. The competition will be held in three groups viz. 6th to 8th, 9th and 10th, 11th and 12th. The competition will be held from October 11, 2021 to November 30, 2021. The schools with the highest student participation will also be honored by the competition organizers.
स्पर्धा दोन भागात होणार असून पहिला भाग वनस्पतीचे फोटो व त्यांची जास्तीत जास्त औषधी गुणधर्म माहिती संकलित करून पीपीटी बनवणे . दुसरा भाग ज्या विद्यार्थ्याकडे संगणक उपलब्ध नसतील त्या विद्यार्थ्यानी वनस्पतीचे कलर फोटो चिकटवून त्या वनस्पतीचे जास्तीत जास्त औषधी गुणधर्म माहितीचे संकलन करणे असे स्वरूप आहे. स्पर्धा ६ वी ते ८वी,९ वी व १० वी ,११ वी व १२ वी अशा तीन गटांत होणार असून तीनही गटासाठी प्रथम क्रमांक २०००/-, द्वितीय क्रमांक १५००/-,तृतीय क्रमांक १०००/- ,उत्तेजनार्थ चार बक्षिसे प्रत्येकी ५००/- असे बक्षिसाचे स्वरुप आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यामधील औषधी वनस्पतीबद्दल जागरुकता निर्माण करणे, आपल्या सभोवतालच्या विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे व मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे फायदे याची माहिती संकलित करणे, विद्यार्थ्यामधील निरिक्षण शक्ती वाढविणे, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि वैज्ञानिक शोधक वृत्ती वाढीस लावणे.आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्लक्षित व दुर्मिळ वनस्पतींचे ज्ञान, शोध व औषधी गुणधर्म यांची माहिती संकलन व उपयोग जाणून घेणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
स्पर्धेचे नियम
1. स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्याने एकाच स्वरूपातील स्पर्धेत सहभाग घ्यावा.
2. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव,शाळेचे नाव ,इयत्ता, मोबाईल नंबर, घरचा पूर्ण पत्ता व पिनकोड क्रमांक असा तपशील द्यावा.
3. नोंदवही व पीपीटी शक्यतो मराठी किंवा हिंदी भाषेत असावी ( नोंदवहीवर स्वतः काढलेली छायाचित्र असावीत).
4. नोंदवही स्व हस्ताक्षरातील किंवा स्वतः काढलेली छायाचित्रे वापरून संगणकीकृत केलेली असावीत अथवा प्रत्यक्ष झाडाचे पान, फूल लावावे.
5. स्पर्धेचा कालावधी ११ ऑक्टोबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ असा असणार आहे.
6. या कालावधीत आपण माहिती गोळा करणे, सर्वेक्षण करणे त्यांचे उपयोग, आयुर्वेदीक स्थान यासंबंधी माहिती गोळा करणे.आपल्या भागात उपलब्ध असलेल्या वनस्पतीची माहिती फोटोसह असावी.
7. परिक्षक स्वतः येऊन क्षेत्राची पहाणी करु शकतात.
8. आपली पीपीटी / नोंदवही दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपदा धोपटकर, जेएसडब्ल्यू एनर्जी लि.सी एसआर ऑफिस मु. नांदिवडे कुणबीवाडी, पो.जयगड, ता. जि रत्नागिरी -४१५६१४ या पत्त्यावर पोहोचेल याची काळजी घ्यावी.
9. ३० नोव्हेंबर २०२१ नंतर आलेल्याची पीपीटी / नोंदवही विचार केला जाणार नाही.
10. तज्ञ परिक्षकांकडून स्पर्धेचे परीक्षण करुन निकाल जाहीर केला जाईल.
11. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेत ज्या शाळेतील जास्त विद्यार्थी सहभागी होतील अशा शाळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रविंद्र इनामदार- ९४२२३८२०८४, प्रभाकर सनगरे-९४२३०५००२९ यांच्याशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांच्याकडून करण्यात आले आहे.