• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

by Mayuresh Patnakar
June 22, 2021
in Old News
16 0
0
आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त करण्यात आले.
Various Medical use materials have been procured for the health department in Guhagar taluka from the MLA’s fund. This material was handed over to the Taluka Medical Officer by Mrs. Purvi Nimunkar, Sabhapati Panchyat Samiti today.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागाला विविध प्रकारचे साहित्य आवश्यक होते. हे साहित्य आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदार निधीमधुन खरेदी करुन दिले. यामध्ये 1 संगणक संच, 1 स्कॅनरची सुविधा असलेला प्रिंटर, 15 थर्मल गन, 15 पल्स ऑक्सिमिटर, 500 मि.लि.च्या 250 सॅनिटायझर बाटल्या, 50 हॉस्पिटल बेड (मॅट्रेस व आ. व्ही. सेट सह), 2500 पीपीई किट, 1 फ्रिज, 2 बायोमेडिकल वेस्ट बकेट सेट (ट्रॉलीसह), 2 स्टॅडींग फॅन, 100 बेडशीट, 1 स्ट्रेचर (ट्रॉलीसह), 1 वॉटर प्युरिफायर  आणि 1 मेडिसन ट्रॉली या साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्याचा कार्यक्रम सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर,पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी सौ. निमुणकर म्हणाल्या की, आमदार भास्कर जाधव यांचे गुहागर तालुक्याकडे लक्ष आहे. कोरोना संकटात जनतेच्या आणि प्रशासनाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी आमदार निधीमधुन त्यांनी हे साहित्य दिले आहे. सीताराम ठोंबरे यांनी आरोग्य यंत्रणेला धन्यवाद दिले. नातेवाईक जेव्हा कोरोना रुग्णापासून लांब पळतात त्यावेळी या रुग्णांवर उपचार करण्याचे काम आरोग्य यंत्रणा करते. या यंत्रणेचे बळ आमदार भास्कर जाधव यांनी वाढविले आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. जांगीड यांनी साहित्य दिल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, तहसीलदार सौ. लता धोत्रे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. घन:श्याम जांगीड, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भोसले, आमदार भास्कर जाधव यांचे सहकारी विनायक मुळे आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.