• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

by Mayuresh Patnakar
June 2, 2021
in Old News
16 0
0
मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर,  ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे  सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात 20 कुटुंबांना शिधा देण्यात आला. उर्वरित शिधा प्रत्येक कुटुंबाला घरपोच करण्यात आला. यावेळी मानसरोग तज्ज्ञ डॉ. सुकुमार मुंजे, भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, मनप्रवाहचे स्थानिक कार्यकर्ते केशव कचरेकर उपस्थित होते.
प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदुळ, ५ किलो पीठ, दोन डाळी, कांदे, बटाटे, मीठ आदी धान्य देण्यात आले.  गेली 10 वर्ष मनप्रवाह ट्रस्टमार्फत पनवेल शहराच्या परिसरात आम्ही काम करत आहोत. पर्यटन व्यवसायावर निर्भर असलेल्या कोकणातील या व्यवसायावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. रोजगार नसल्याने अनेकजण अडचणीत आहे. त्यांच्या छोटशी मदत म्हणून आम्ही शिधा वाटप केले आहे. अशी माहिती मनप्रवाह ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुकुमार मुंजे यांनी दिली.  
Manpravah Trust in Panvel distributed rations to 30 poor and needy families in Guhagar city. The Program held in Indirabai Vasudev Shete Hall. The ration was given to 20 families. The ration was delivered to the remaining 10 families’ Homes. At this time, psychiatrist Dr. Sukumar Munje, Bhandari Samaj president Bharat Shete, Manpravah local activist Keshav Kacharekar were present.

कोण आहेत डॉ. मुंजे ?

पनवेल येथे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुकुमार मुंजे यांनी प्रगत संमोहन शास्त्रात एम.डी. ही पदवी घेतली आहे. तसेच मानसोपचार आणि संमोहन चिकित्सा या विषयात त्यांनी पीएचडीही मिळवली आहे. संमोहनशास्त्राद्वारे चिकित्सापध्दती त्यांनी विकसीत केली आहे. मुंबईतील प्रभादेवी, नवी मुंबईतील वाशी आणि पनवेल व बेंगलोर येथे त्याची मनप्रवाह चिकित्सालये आहेत. या चिकित्सालयामध्ये संमोहनशास्त्र चिकित्सा आणि मानसोपचार केला जातात. तसेच मानसशास्त्रीय सल्लागार म्हणूनही डॉ. मुंजे काम करतात. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल भारत सरकारने त्यांना 2020 मध्ये सन्मानित केले आहे. इंदिरा गांधी सुवर्णपदकाचे ते मानकरी आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उत्कृष्टता पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. 2017 मध्ये भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे देशातील 5000 व्यावसायिकांनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. सुकुमार मुंजे यांचा समावेश होता. जागतिक अर्थव्यवस्थेची प्रगती आणि संशोधन करणाऱ्या संस्थेचे डॉ. मुंजे सदस्य आहेत.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.