• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड

by Guhagar News
May 11, 2026
in Guhagar
90 1
0
Manoj Patil elected as center chief
177
SHARES
507
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील शिक्षक डॉ. मनोज नरसी पाटील यांची गुहागर केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर नंबर 2 शाळेमध्ये प्रभारी केंद्रप्रमुख श्री ईश्वर वासावे यांचेहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच गुहागर उर्दू शाळेच्या बागवान मॅडम व असगोली नंबर 1 शाळेमध्ये अष्टपैलू मुख्याध्यापक श्री चंद्रकांत झगडे यांचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. Manoj Patil elected as center chief

यावेळी केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, शेख सर, लोंढे मॅडम, ईश्वर हलगरे, श्री प्रदीप पवार, अंजली मुद्दमवार, दीक्षा गुरव इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत झगडे सर म्हणाले की, गुहागर केंद्रातील सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी मनोज पाटील यांचे विषयी गौरव उद्गार काढले. आपल्यातील एका शिक्षक बांधवाला केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ मनोज पाटील यांना मिळालेली पदोन्नती म्हणजे आपल्या प्रामाणिक कार्याची ही पोच पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. Manoj Patil elected as center chief

मनोज पाटील म्हणाले की, गुहागर केंद्र हा गुणवत्ता क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी येथे शिक्षक प्रायोगिकतेने विविध उपक्रम राबवत असतात,  केंद्रात असणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांना त्यांनी धन्यवाद दिले. Manoj Patil elected as center chief

एकेकाळी इयत्ता आठवी मध्ये नापास झालेले, एचडी नाईक बर्फ फॅक्टरी मध्ये दरमहा पाचशे रुपये पगार व दर दिवशी पंधरा रुपये भत्ता मिळवून टँकरवर क्लीनर म्हणून काम करणारे मनोज पाटील यांनी जिद्दीने बी.ए ,बी.एड, एम .ए , एम.एड, जीडीसी अँड ए, डीएसएम, एम.फिल, पीएचडी पर्यंत उच्च शिक्षण घेतले. गेली तीस वर्ष शिक्षण क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवले, पंचायत समिती गुहागर येथे सात वर्ष त्यांनी विषय तज्ञ पदावर काम पाहिले. ते मुख्याध्यापक असलेल्या पडवे केंद्रातील तवसाळ तांबडवाडी शाळेला तसेच अंजनवेल केंद्रातील वेलदूर नवानगर शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वेलदुर नवानगर शाळेची राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या, विद्या प्राधिकरण यांनी राबविलेल्या उपक्रमामध्ये वर्धा, नांदेड, जळगाव, मुंबई व कोल्हापूर या ठिकाणी निवड झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळेची निवड झाली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वी काशविंडा या पुस्तकासह पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक म्हणून गौरविलेले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड होताच गुहागर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Manoj Patil elected as center chief

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsManoj Patil elected as center chiefMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.