गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वरमध्ये असलेले महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे बहुआयामी अभियंता बनविणारे विद्यापीठ आहे.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त येथे शास्त्रज्ञ परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता येतो.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला (innovation), वाव मिळावा म्हणून आभासी प्रयोगशाळेद्वारे उच्च तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली जाते. त्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरींग, बी.ए.टी.यू, आदी नामांकित संस्थांसोबत कॉलजे सामंजस्य करार केले आहेत. विद्यार्थ्यांकडून दैनंदिन जीवनात वापरता येतील अशी उपकरणे बनवून घेतली जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी रोबो कार रेस, ऑटो एक्स्पो, ड्रोन बनविणे आदी उपक्रम घेतले जातात.
इस्त्रोसारख्या मोठ्या संस्था, उद्योगांना भेट देवून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येते.
व्हीबॉक्स रोजगार कौशल्य परीक्षा, नॅशनल प्रोग्रामिंग एप्टीट्यूड टेस्ट (NPAT), उद्योग जगतातील तज्ञांची व्याख्याने, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, लेथ ऑपरेटर कोर्स असे प्रत्येक शाखेच्या विभागाचे उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात.
या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधुन आपला ठसा उमटविला आहे.
अभियंता बनलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या. GATE मध्ये विद्यार्थी पात्र ठरले. एम टेकसाठी आयआयटी सारख्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला.
परगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी महाविद्यालयाचे स्वत:चे विद्यार्थी आणि विद्यार्थींनींसाठी स्वतंत्र वसतीगृह उपलब्ध आहे. या वसतीगृहाच्या मासिक फीमध्ये २ वेळचे जेवण, नाश्ता यासह गरम पाणी, इंटरनेट, व्यायामशाळा आणि गरजेनुसार वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्कॉलरशिप योजनेची सुविधाही उपलब्ध आहे. (शासकीय निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळेल.)
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात *कोकण कन्या शिष्यवृत्ती* दिली जाते.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शैक्षणिक वर्षात वरीलप्रमाणे अनेक उपक्रम घेवून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने अभियांत्रिक बनविण्याचे उद्दीष्ट या संस्थेने ठेवले आहे. त्याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांसाठी देखील अनेक उपक्रम महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे घेतले जातात.
या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये खालील अभियांत्रिकी विभागांसाठी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे.
* सिव्हिल इंजिनियरिंग (Civil Engineering)
* इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग (Electrical (Engineering)
* मेकॅनिकल इंजिनियरिंग (Mechanical Engineering)
* इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग (Instrumentation Engineering)
* इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग (Electronics and Telecommunication Engineering)
कोणतेही डोनेशन नाही शिवाय फ्री प्रवेश.
* (या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.)
आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रा. आशिष चौधरी 9307949556 / प्रा. रोहन गोंधळेकर 9004518067
ईमेल. info@vpmmpcoe.org
पत्ता : वेळणेश्वर, ता. – गुहागर, जि. – रत्नागिरी, राज्य महामार्ग क्रमांक ७८ हेदवी मार्ग, गुहागर, महाराष्ट्र ४१५७२९.
आपली ऍडमिशन (फर्स्ट इयर / डायरेक्ट सेकंड इयर) बुक करण्यासाठी google form या शब्दांवर क्लिक करा.
महाविद्यालयाची अधिक माहिती पहाण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.