समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पुणे ते बंगळूर असा विकसित करण्यात येणार असून यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तर्फे केले जाणार आहे. Maharashtra will get another eight-lane highway
या नव्या आठ पदरी महामार्गाच्या बांधकामाला २०२६ मध्ये सुरुवात होणार असून याचे काम केवळ दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम भारतमाला परीयोजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा आधुनिक महामार्ग ‘भारतमाला’ योजनेअंतर्गत विकसित होणार आहे. या नव्या आधुनिक प्रकल्पामुळे पुणे – बेंगलोर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. Maharashtra will get another eight-lane highway

सध्याचा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ सुमारे ८५६ किलोमीटर लांबीचा आहे. पण नवा महामार्ग ७४५ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग कोणत्याही मोठ्या शहरातून जाणार नाही, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीपासून प्रवास निर्विघ्न होणार आहे. प्रमुख शहरांना जोडण्यासाठी स्वतंत्र उपमार्ग तयार केले जातील. या महामार्गावरून वाहनांना ताशी १२० किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. दोन लेन ट्रक व बससाठी तर उर्वरित लेन चारचाकी वाहनांसाठी आरक्षित राहतील. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना प्रवेश नसल्याने वाहतुकीची गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहेत. हा संपूर्ण महामार्ग सिमेंट काँक्रीटचा राहणार आहे. याच्या दोन्ही बाजू बंदिस्त असतील. त्यामुळे रस्त्यावर जनावरांना प्रवेश करता येणार नाही. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. Maharashtra will get another eight-lane highway
हा महामार्ग सात जिल्ह्यांमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून तसेच कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, दावणगिरी आणि चित्रदुर्ग या चार अशा एकूण सात जिल्ह्यांतून हा रस्ता जाणार आहे. आता या प्रकल्पासाठी दोन्ही राज्यांकडून मंजुरी मिळाली असून, सर्वेक्षण आणि भूसंपादनाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. हा नवा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे-बंगळूर प्रवास केवळ सात तासांत पूर्ण होणार आहे. तसेच बेळगाव-बंगळूर प्रवास चार ते पाच तासांत पूर्ण होईल. या महामार्गामुळे विद्यमान राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होऊन पश्चिम-दक्षिण भारतातील आर्थिक आणि औद्योगिक संपर्क अधिक वेगवान होणार आहे. Maharashtra will get another eight-lane highway
