भास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९८५ सालापासून वरवेली बुध्द विहारमध्ये स्थापित केलेल्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन व ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवाला मानवंदना व अभिवादन आणि समाज प्रबोधन करण्यासाठी सायं. ६ वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे. Mahaparinirvana ay at Varaveli


या सभेला प्रमुख वक्ते म्हणून विविध पुरस्कार प्राप्त आणि आदर्श सरपंच म्हणून प्रसिद्ध असलेले भास्कर पेरे पाटील यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माझा गाव माझा विकास या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बौध्द विकास मंडळ, वरवेलीच्या वतीने करण्यात आले आहे. Mahaparinirvana day at Varaveli