• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाड कोर्टात राणेंचा जामीन मंजूर

by Mayuresh Patnakar
August 25, 2021
in Old News
16 0
0
महाड कोर्टात राणेंचा जामीन मंजूर
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. महाड कोर्टामधील प्रथम वर्ग न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती बाबासाहेब शेख पाटील यांच्यासमोर नारायण राणेंना हजर करण्यात आले होते.  संपूर्ण प्रक्रिया आटपून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाडमधुन रात्री 12 वा. मुंबईकडे रवाना झाले.
Union Minister Narayan Rane, who was arrested for making controversial remarks against the Chief Minister, has finally been granted bail. Narayan Rane was produced before Hon. Justice Babasaheb Sheikh Patil First Class Court in Mahad Court. After completing the entire process, Union Minister Narayan Rane left Mahad at 12 o’clock at night.


संगमेश्र्वर तालुक्यातील गोळवली येथे दुपारी 3.30 च्या दरम्यान पोलीसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर संगमेश्र्वर पोलीस ठाण्यात अटकेची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर नारायण राणे यांना महाड एमआयडीसीच्या पोलीस ठाण्यात नेले. मंगळवार, 24 ऑगस्टला रात्री 9.00 वा. नारायण राणे महाड कोर्टामधील प्रथम वर्ग न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती बाबासाहेब शेख पाटील यांच्यासमोर हजर झाले.
रायगड पोलीसांनी कोर्टामध्ये सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सरकारी वकिलांनी कोर्टासमोर केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यामुळे राज्यात अप्रिय घटना घडल्या. असा युक्तीवाद केला. तर नारायण राणे यांच्या वकिलांनी अटकेपूर्वी नोटीस दिली नाही. राणे यांच्यावर अटकेसाठी लावली कलमे चुकीची आहे. असे मुद्दे मांडत जामिनाची मागणी केली. अखेर मा. न्यायालयाने रात्री 11.00 नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला.

Tags: ArrestBailBreaking Newschief Ministercontroversial statementGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahad Court GuhagarMarathi NewsNarayan RaneNews in GuhagarNews in MarathiUnion Ministerटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.