आफ्रोह महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत निर्णय
गुहागर : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह) या कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उषा पारशे व सचिव म्हणून माधुरी मेनकार यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या आफ्रोह, रत्नागिरीच्या महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष माधुरी घावट या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे उपकेंद्र येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. उपाध्यक्ष उषा पारशे या संगमेश्वर तालुक्यात आरोग्य सेविका तर माधुरी मेनकार या दापोली तालुक्यात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट यांच्यासह उपाध्यक्ष उषा पारशे, सचिव माधुरी मेनकार यांच्या निवडीबाबत आफ्रोह महिला आघाडीअध्यक्षा अनघा वैद्य, आफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियाताई खापरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी अभिनंदन केले आहे.