• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा न्यायालयात ‘लोकअदालत’ यशस्वी

by Manoj Bavdhankar
May 15, 2026
in Ratnagiri
142 1
0
'Lok Adalat' at the District Court
278
SHARES
795
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा निपटारा

​रत्नागिरी, ता. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकअदालती’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण ४,३२६ प्रकरणांचा सामोपचाराने यशस्वी निपटारा करण्यात आला. ​प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. ‘Lok Adalat’ at the District Court

​​लोकअदालतीसमोर जिल्ह्यातील ​प्रलंबित प्रकरणे: एकूण ३,८७२ प्रकरणांपैकी १५२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. ​वाद दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे: १५,३४० प्रकरणांपैकी तब्बल ४,१७४ प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. ​या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांवर चर्चा होऊन ती मिटवण्यात आली, ज्यात ​दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी खटले. ​धनादेश (Cheque Bounce) आणि वैवाहिक वादाची प्रकरणे. ​बँका, पतसंस्थांची वसुली प्रकरणे. ​थकीत वीज बिल आणि टेलिफोन बिल संबंधित वाद. ‘Lok Adalat’ at the District Court

​ या लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, सर्व तालुका विधी सेवा समितीचे न्यायाधीश, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामोपचाराने वाद मिटवल्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचला असून, न्यायालयीन कामकाजाचा ताणही हलका होण्यास मदत झाली आहे. ‘Lok Adalat’ at the District Court

Tags: 'Lok Adalat' at the District CourtGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet70
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.